कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!

दिशा रवी या 22 वर्षीय पर्यावरणवादी तरुणीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली आहे. (Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist )

कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!
दिशा रवी
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 11:25 AM

नवी दिल्ली: दिशा रवी या 22 वर्षीय पर्यावरणवादी तरुणीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी तिला अटक करण्यात आली असून तिच्या अटकेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, बॉलिवूड आणि विद्यार्थी जगतातूनही दिशा रवीच्या अटकेचा निषेध नोंदवला जात आहे. (Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist )

दिशा रवी काय करते?

दिशा रवी ही पर्यावरणवादी आहे. जलवायू संदर्भात जनजागृती करण्याचं काम ती करते. ती बेंगळुरूची रहिवासी आहे. दिशा बेंगळुरूच्या प्रतिष्ठीत माऊंट कार्मेलची विद्यार्थीनी आहे. तिने माऊंट कार्मेल महाविद्यालयातून बीबीएची पदवी घेतली आहे. दिशाचे वडील रवी हे मैसूरमध्ये अॅथेलिटिक्स कोच आहेत. तर आई गृहिणी आहे. तसेच फ्राइडेज फॉर फ्यूचर इंडिया नावाच्या संस्थेची ती संस्थापक आहे. सध्या ती गुड वेगन मिल्क नावाच्या संस्थेत काम करते. प्लान्ट बेस्ड फूड अधिक स्वस्त आणि सुलभ बनविण्याचं काम ही संस्था करते. गाय, म्हशींसह प्राण्यांवर आधारीत कृषी पद्धत संपुष्टात आणून प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार द्यावा, अशा मताची दिशा रवी आहे.

आरेसाठी आंदोलन

वातावरणातील बदलाच्या मुद्द्यावर तिचं काम सुरू आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच ती या विषयावर काम करत आहे. मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्ष तोडण्याचं प्रकरण असो की केंद्र सरकारने आणलेल्या EIA 2020 कायदा असो, प्रत्येकवेळी तिने विरोध केला आहे. तिच्या फ्रायडे फॉर फ्यूचर संस्थेत साधारणपणे 100 ते 150 सदस्य सक्रिय आहेत. हे सर्व जण बेंगळूरूमध्ये काम करतात. दिशा रवी सातत्याने पर्यावरणावर वृत्तपत्रातून स्तंभलेखन करते, लेख लिहते.

खलिस्तानी समर्थकांशी हातमिळवणी?

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने हेच टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. ही टुलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे. (Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist )

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय?

सूत्रांच्या मते, दिशा रवीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये निकिता जेकबही होती. निकिता सुद्धा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. तिची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या सायबर सेलने निकिताशी संपर्कही साधला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार दिशाचा मोबाईल डाटा डिलीट झाला असून हा डेटा रिट्रीव केला जाणार आहे. त्यामुळे या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय माहिती शेअर केली जात होती, याची माहिती मिळणार आहे. दिशा रवीशी संबंधित शांतनू नावाचा व्यक्तीही पोलिसांच्या रडावर आहे.

टुलकिट वाद काय आहे?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट करून स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने समर्थन केलं होतं. या ट्विटमध्ये आंदोलन कसं करावं, याची माहिती देणारे टुलकिट शेअर करण्यात आले होते. शेतकरी आंदोलन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती त्यात होती. ट्विटमध्ये कोणते हॅशटॅग असावेत, काय केले पाहिजे, कसा बचाव करावा याची सर्व माहिती या टुलकिटमध्ये होती. ग्रेटाने आधीचं टुलकिट डिलीट करून नंतर नवं टुलकिट शेअर केलं होतं.

टुलकिट काय आहे?

टुलकिट हे डिजीटल शस्त्रं आहे. याचा उपयोग आंदोलनाला सोशल मीडियाला हवा देण्यासाठी होतो. अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनात त्याचा पहिल्यांदा वापर करमअयात आला. आंदोलन अधिक व्यापक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून या टुलकिटचा वापर केला जातो. यात आंदोलनात सहभागी होण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलनाविरोधात अॅक्शन घेतली तर काय करायचे? याची माहितीही त्यात देण्यात आळी आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना घ्यावयाची काळजी, आंदोलन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी काय करायचे याचीही माहिती यात आहे. (Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist )

संबंधित बातम्या:

त्यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं तर थेट IPS अधिकाऱ्यानं नोकरी सोडली, म्हणाले, थेट गावी जाऊन शेती करतो !

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात, अमित शाहांना भाजपचा पक्षविस्तार नेपाळ, श्रीलंकेतही हवा

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश

(Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.