Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?

दक्षिण कश्मीरमधील पुलवामात सर्वात मोठा भ्याड दहशतवादी हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ ​​वकासनं सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केला. सीआरपीएफच्या 70 गाड्यांच्या ताफ्यात 2 हजार 547 जवान होते. या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. भारतीय जवानांच्या बसला 350 किलोग्रॅम विस्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीनं […]

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

दक्षिण कश्मीरमधील पुलवामात सर्वात मोठा भ्याड दहशतवादी हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ ​​वकासनं सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केला.

सीआरपीएफच्या 70 गाड्यांच्या ताफ्यात 2 हजार 547 जवान होते. या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. भारतीय जवानांच्या बसला 350 किलोग्रॅम विस्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीनं धडक दिली. आदिल अहमद दार हा दहशतवादी ही स्कॉर्पिओ गाडी चालवत होता.

बुरहान वानी या दहशतवाद्याला 3 वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी ठार केलं. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर जम्मू आणि श्रीनगरमधील मोठ्या प्रमाणात तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले. आदिल अहमद दार हाही त्यातलाच एक.

आदिल हा गेल्या वर्षी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. आदिलचं जास्त शिक्षण झालं नव्हतं. एका स्थानिक मशिदीत तो अजाण देण्याचं काम करत होता. 19 मार्च 2016 रोजी पुलवामाच्या गुंडीबाग येथून आदिल अहमद दार बेपत्ता झाला होता. त्यांचे 2 मित्र तौसिफ आणि वासिम देखील बेपत्ता झाले होते. 2018 मध्ये आदिल जैश-ए-मोहम्मद संघटनेत सामील झाल्यानंतर त्याचा काश्मीरच्या घाटीमध्ये मोठया दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होता. आदिलला अलिकडेच अफगान मुजाहिद जैशचा दहशतवादी गाझी रशीदनं प्रशिक्षण दिलं होतं. मे 2018 मध्ये एका ऑपरेशन दरम्यान जवानांनी आदिलला घेरलंही होतं. मात्र त्यावेळी त्याला तिथून पळून जाण्यात यश मिळालं होतं.

संबंधित बातम्या : 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक : जितेंद्र आव्हाड

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?

Pulwama attack : शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.