दिल्ली हिंसाचाराला जबाबदार कोण? राकेश टिकैत? दीप सिद्धू? लक्खा सिधाना?

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. (who is responsible for delhi violence?)

दिल्ली हिंसाचाराला जबाबदार कोण? राकेश टिकैत? दीप सिद्धू? लक्खा सिधाना?
शेतकरी नेते
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:25 AM

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या हिंसेला शेतकरी नव्हे तर इतर लोकच जबाबदार असल्याचं आता पुढे येऊ लागलं आहे. त्यात शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर ते राजकारणी अशा भूमिकेत असलेल्या लक्खा सिधानाची नावंही पुढे आली आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता या तिघांचाही या हिंसेतील रोल तपासण्याचं काम सुरू केलं आहे. (who is responsible for delhi violence?)

या हिंसेप्रकरणी पंजाबी अभिनेते दीप सिद्धू यांनाही जबाबदार धरलं जात आहे. दीप सिद्धूने फेसबूकवर एक पोस्ट लिहून त्याबाबत खुलासा केला आहे. आम्ही लोकशाहीच्या अधिकारातून लाल किल्यावर आमचा झेंडा फडकावला. पण आम्ही तिरंगा झेंडा काढला नाही, असं दीप सिद्धूने म्हटलं आहे.

योगेंद्र यादव यांचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी या हिंसेला लक्खा सिधाना आणि दीप सिद्धू यांना जबाबदार धरलं आहे. दीप सिद्धू आणि लक्खा सिधाना परवाच्या रात्री सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. दीप सिद्धू मायक्रोफोन घेऊन लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी योगेंद्र यादव यांनी केली आहे. भारतीय किसान यूनियनचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांनीच शेतकऱ्यांना भडकावून त्यांना मिसगाईड केल्याचा आरोप केला आहे.

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धूचा जन्म 1984 रोजी पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात जन्म झाला. त्याने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर हंट अॅवार्ड जिंकण्यापूर्वी तो बार असोसिएशनचा सदस्य होता. 2015मध्ये रमता जोगी हा त्याचा पहिला पंजाबी सिनेमा प्रदर्शित झाला. 2018मध्ये आलेल्या जोरा दास नुम्बरिया या सिनेमाने त्याला ओळख मिळाली. या सिनेमात त्याने गँगस्टरची भूमिका साकारली होती. अभिनेते सनी देओल यांनी गुरुदासपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी तो निवडणूक प्रचारात दिसला होता. अभिनेता सनी देओलशी त्याचे चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे. पण सनी देओलने त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राकेश टिकैत यांनी हिंसा भडकावली?

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रॅक्टर मार्चच्या पूर्वीचे राकेस टिकैत यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. रॅलीत दांडके घेऊन येण्याची भाषा ते करताना दिसत आहेत. मात्र, त्यावर टिकैत यांनी सारवासारव केली आहे. झेंडे लावण्यासाठी दांडके आणण्यास मी सांगितलं होतं. दांड्याशिवाय झेंडा कसा लावणार? हे तुम्हीच सांगा, असं ते म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, टिकैत यांनी या हिंसेला दीप सिद्धूलाच जबाबदार धरलं आहे. दीप सिद्धू शीख नाही. तो भाजपचा कार्यकर्ता आहे. मोदींसोबत त्याचे फोटो आहेत. हे शेतकऱ्यांचं आंदोलन असून शेतकऱ्यांचंच राहील. या आंदोलनात काही लोक घुसले असून त्यांना हटवण्यात यावं, असं टिकैत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रॅलीपूर्वी शेतकरी नेत्यांनी केलेली विधानंही तपासण्यात येणार आहे. टिकैत यांचीही भाषणं तपासण्यात येणार असून या हिंसेला ते तर जबाबदार नाहीत ना? याचा तपास होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लक्खा सिधानाच व्हिडीओ व्हायरल

गँगस्टर ते राजकारणी बनलेल्या लक्खा सिधानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून लक्खा सिधाना केवळ शेतकऱ्यांनाच भडकावत नाही तर मीडियालाही धमकावत असल्याचं दिसून येत आहे. तरुणांना आपण भडकावत असल्याचा मीडियाने प्रचार करू नये, असा इशारा देताना तो या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ 17 जानेवारीचा आहे. आपण समाजसेवक असल्याचं सांगणाऱ्या लक्खावर पंजाबमध्ये दोन डझनपेक्षाही गुन्हे दाखल आहेत. हत्या, अपहरण, खंडणी आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याशिवाय आर्म्स अॅक्ट अंतर्गतही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असून या प्रकरणामध्ये त्याने शिक्षाही भोगलेली आहे. तर अनेक प्रकरणात साक्षीदार किंवा पुरावे नसल्याने त्याची निर्दोष सुटकाही झालेली आहे.

दरम्यान, आयटीओ येथे झालेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्याने ट्रॅक्टरवर स्टंट केला आणि पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करताना ज्याचा मृत्यू झाला त्याचंही या एफआयआरमध्ये नाव आहे. तसेच हिंसा भडकावणाऱ्या अज्ञातांची नावेही एफआयआरमध्ये दाखल आहेत. विशेष म्हणजे या हिंसेप्रकरणी लक्खाला जबाबदार धरलं जात असलं तरी त्याचं नाव कोणत्याही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही. (who is responsible for delhi violence?)

योगेंद्र यादवांची भूमिका

योगेंद्र यादव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते स्वराज अभियानचे प्रमुख आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सध्या या आंदोलनात ते प्रमुख भूमिका पार पाडत आहेत. शेतकरी आंदोलनात त्यांची महत्त्वाीच भूमिका राहिली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी आंदोलनाला कोणतंही गालबोट लागू नये, हे आंदोलन भरकटू नये म्हणून यादव यांनी सातत्याने काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरच या आंदोलनाचा कसा फोकस राहील आणि त्याला राजकीय वळण मिळणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे. (who is responsible for delhi violence?)

संबंधित बातम्या:

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

LIVE | महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, कुठे फेडाल हे पाप?, शेतकरी आंदोलन हिसांचारावरुन भाजपचा हल्लाबोल

(who is responsible for delhi violence?)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.