Seema Haider : प्रेमाचा ‘सीमा’वाद, सीमा हैदर भारतासाठी धोकादायक ठरणार?; काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रकरण उघडकीस आल्यानंतर 2 जुलैला सीमा आणि सचिनला अटक करण्यात आली. यानंतर, या दोघांनाही देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मिळाला. संपूर्ण देशात या प्रकरणाने खळबळ माजली आहे.

Seema Haider : प्रेमाचा 'सीमा'वाद, सीमा हैदर भारतासाठी धोकादायक ठरणार?; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Seema HaiderImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 2:41 PM

नवी दिल्ली : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, पण प्रेमामुळे दोन देशांना समोरासमोर यावं लागंल तर? आणि त्यातही खेल खेल मे प्यार हो गया अशी कहानी असेल तर? तुम्ही म्हणाल हे कसलं प्रेम? सध्या पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर गंभीर विषय बनलीये. कारण भारताने सीमा हैदरला परत पाठवलं नाही तर हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी पाकिस्तानी डाकूंनी दिलीये…एकीकडे पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून संशयाचे डोळे तर दुसरीकडे भारतासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? या संशयाने सीमा हैदरकडे पाहिलं जातंय…. आपल्या चार मुलांना घेऊन प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडणारी म्हणून सध्या सीमा हैदर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पाकिस्तानमध्ये राहणारी, पहिलं लग्न होऊन नवरा दुसऱ्या देशात आणि प्रेम प्रकरण तिसऱ्या देशात….हाच ट्विस्टेड अँगल सीमा हैदरच्या कहाणीकडे लोकांना आकर्षित करतोय… सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमात मुन्नीला तिच्या घरी पाठवण्यासाठी सलमान बेकायदेशीररित्या पाकिस्तानात जातो, तशीच काहीशी गोष्ट सीमा हैदरची आहे. बेकायदेशीररित्य सीमा पार करून सीमा हैदर आपल्या मुलांना घेऊन भारतात येते, आणि आपला नवा संसार थाटते. प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे, सविस्तररित्या समजून घेऊया…

हे सुद्धा वाचा

सीमा हैदर नेमकी कोण?

सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानच्या कराची शहरातील सिंधची. 2014 मध्ये गुलाम रझासोबत तिचा निकाह झाला. वयाच्या 15 व्या वर्षीच तिला पहिलं अपत्य झालं. त्यानंतर ती चार मुलांची आईही बनली. गुलाम हैदर कराचीमध्ये टाईल्स बनवण्याचं काम करत होता, त्यानंतर 2019 मध्ये तो कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला. गुलाम हैदर परदेशात गेल्याने सीमा मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवू लागली. तेव्हा तिने PUBG खेळायला सुरुवात केली. ही 2019ची गोष्ट.

PUBG खेळताना सीमाने पहिल्यांदाच भारताच्या उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरमधील सचिन मीणासोबत ऑनलाईन PUBG खेळायला सुरुवात केली. PUBG खेळताना दोघांमध्ये बोलणं वाढलं. दोघांनी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली. एकमेकांना नंबर दिले. व्हिडिओ कॉलिंग सुरू झाली आणि दोघांमधील जवळीक वाढली.. अन् एके दिवशी त्यांनी प्रत्यक्षात भेटायचं ठरवलं …

पहिली भेट अशी झाली

2019 नंतर जवळीक वाढत गेली. दोघांनी भेटायचं ठरवलं आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. पार्सपोर्ट काढण्यासाठी सीमाची हालचाल सुरु झाली मात्र काही केल्या पार्सपोर्ट मिळेना. मग सीमाने टुरिस्ट व्हिसा मिळवून नेपाळला भेटायचं ठरवलं. आपल्या चार मुलांना बहिणीकडे सोडून सीमा नेपाळला आली आणि त्यांची पहिली भेट झाली. तो दिवस होता 10 मार्च 2023. त्यांनी पहिल्याच भेटीत 13 मार्चला पशुपथी मंदिरात हिंदु पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर 7 दिवस एकत्र घालवले. त्यानंतर सीमा पुन्हा 17 मार्चला कराचीला गेली.

अन् भारत गाठलं…

नेपाळ भेटीत दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. कराचीला परत आल्यावर सीमाने ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधला. ती तिच्या 4 मुलांसह भारतात कशी जाऊ शकते, यासाठी प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानातून भारताच्या व्हिसासाठी प्रयत्न केले. मात्र व्हिसा नाकारला गेला. त्यानंतर तिला कळलं की ती नेपाळमार्गे भारतात सहज प्रवेश करू शकते. या सगळ्यासाठी खूप पैसा खर्च होणार होता. सीमा कराचीमधून भारताकडे यायला निघाली. तेव्हा तिच्याकडे 300 डॉलर म्हणजे जवळपास 25 हजार रुपये होते.

सीमाच्या म्हणण्यानुसार, तिने 4 मुलांसह एका व्हॅनमधून काठमांडू ते पोखरा असा प्रवास केला. 10 मे रोजी पाकिस्तानमधून काठमांडूला पोहोचली. रात्र झाल्यामुळे ती तिथेच थांबली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोखरा येथून दिल्लीला जाण्यासाठी बस पकडली. FIR नुसार, 13 जुलैच्या रात्री सीमा हैदर आपल्या 4 मुलांसोबत यमुना एक्सप्रेसवेवर उतरली. तिथे सचिन तिची वाट पाहत होता. सीमाच्या म्हणण्यानुसार, तिने पाकिस्तान ते नेपाळपर्यंत वैधरित्या प्रवास केला. मात्र नेपाळ ते भारत हा प्रवास बेकायदेशीरपणे केल्याचं ती मान्य करते.

धमकावणारा कॉल

प्रकरण उघडकीस आल्यानंतर 2 जुलैला सीमा आणि सचिनला अटक करण्यात आली. यानंतर, या दोघांनाही देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मिळाला. संपूर्ण देशात या प्रकरणाने खळबळ माजली आहे. मुंबईच्या वाहतूक पोलीस कंट्रोल रूमला 12 जुलैला धमकी देणारा एक फोन आलाय. जर सीमा हैदर पाकिस्तानमध्ये परतली नाही तर भारताचा नाश होईल, अशी धमकी या फोन करणाऱ्याने उर्दू भाषेत दिलीय.

26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार रहा आणि यासाठी उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करतेय. तर दुसरीकडे यापूर्वी 11 जुलै रोजी बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेने एक व्हिडिओ जारी करत भारताला थेट धमकी दिली होती…

काय होता तो धमकीचा व्हिडीओ?

23 वर्षीय सचिन आणि सीमाच्या सांगण्यानुसार, 27 वय वर्ष असं दोघांचं. दोन देशांच्या संबंधांपलिकडील प्रेमप्रकरण पुढे काय वळणं घेतय. याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे सीमाचा पाकिस्तानमधील नवरा गुलाम हैदर भारताकडे विनवणी करतोय की, सीमा आणि चार मुलांना परत पाठवा तर दुसरीकडे सीमा भारत सरकारकडे भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी विनवणी करतेय. मी मरेल पण पाकिस्तानात जाणार नाही, असं ती ठामपणे सांगतेय.

पाकिस्तान आणि भारताचे संबंध साऱ्या जगाला माहित आहेत, एका प्रेमप्रकरणामुळे वाद पेटेल का? पाकिस्तानातील डाकूंच्या धमकीनुसार हिंदु मंदिरांना धोका आहे का? यावर भारत काय उत्तर देईल? सीमाला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल का? भारत सरकार या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहिल? याकडे पाहणं महत्त्वाच ठरेल.

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.