PM Modi ISRO : पंतप्रधानांच्या ISRO भेटीवरुन राजकारण, स्वागताला कर्नाटकचे मुख्यमंत्री का नव्हते?

PM Modi ISRO : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हते. याच मुद्यावरुन आता राजकारण सुरु झालय.

PM Modi ISRO : पंतप्रधानांच्या ISRO भेटीवरुन राजकारण, स्वागताला कर्नाटकचे मुख्यमंत्री का नव्हते?
PM Modi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 11:28 AM

बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी बंगळुरुमध्ये दाखल झाले. चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगबद्दल त्यांनी इस्रोच्या मुख्यालयात जाऊन वैज्ञानिकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हते. याच मुद्यावरुन आता राजकारण सुरु झालय. पंतप्रधान मोदी यांनी मुद्दामून त्यांच्या स्वागताला येण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखलं, असा दावा काँग्रेसने केला आहे.

“पंतप्रधान मोदींच्या आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचा सन्मान केला. म्हणून मोदी वैतागले होते. त्यामुळे मोदींनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांना स्वागतला येण्यापासून रोखलं. हे शिष्टाचाराच्या विरोधात आहे. यात फार काही नाहीय. हे क्षुद्र राजकारण आहे” असं वरिष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

‘पंतप्रधान मोदी हे विसरलेत का?’

“पंतप्रधान मोदी हे विसरलेत का? ते मुख्यमंत्री असताना, चांद्रयान-1 च्या यशस्वी लॉन्चिंग नंतर 22 ऑक्टोबर 2008 रोजी ते अहमदाबादच्या स्पेस एपिलेक्शन सेंटरमध्ये गेले होते. त्यावेळी मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते” असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी यावर काय सांगितलं?

“बंगळुरुमध्ये कधी पोहोचणार हे आपल्यालाच माहित नव्हतं. म्हणून इतक्या सकाळी मंत्र्यांना त्रास द्यायचा नव्हता” असं पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आलं. “बंगळुरुमध्ये कधी पोहोचणार हे माहित नव्हतं, त्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना इतक्या सकाळी माझ्या स्वागताला येऊ नका अशी विनंती केली होती” बंगळुरुच्या HAL विमानतळाबाहेर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.

‘ते मलाच माहित नव्हतं’

“मी स्वत:च मुख्यमंत्री आणि राज्यपालांना सांगितलं की, त्यांनी येऊ नये. कारण शास्त्रज्ञाना भेटून मी निघणार आहे. मीच त्यांना शिष्टाचाराचा पालन करण्यापासून थांबवलं, कारण मी कधी बंगळुरुला पोहोचणार ते मलाच माहित नव्हतं” असं मोदी उपस्थित समुदायासमोर बोलताना म्हणाले. पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते. तिथून ते ग्रीसला गेले. आज सकाळी मायदेशी परतल्यानंतर तडक इस्रोच्या मुख्यालयात गेले. मोदींनी चांद्रयान-3 च लँडिंग दक्षिण आफ्रिकेतून लाइव्ह पाहिलं. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर त्यांनी शास्त्रज्ञांना संबोधितही केलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.