UP Elections 2022: का अखिलेश यादव निवडणूक लढवणार नाहीत? काय आहे फॉर्म्युला?

समाजवादी पक्ष हा भाजपला टक्कर देणारा उत्तर प्रदेशचा महत्वाचा पक्ष आसूनही अखिलेश निवडणुक न लढवण्याचं काय कारण आहे? असा प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या (Mamta Banerjee) पराभवाने समाजवादी पक्षाचे प्रमुख घाबरले आहेत का? का भाजपच्या चक्रव्यूहात अडकायला नको म्हणून त्यांनी हो निर्णय घेतला?

UP Elections 2022: का अखिलेश यादव निवडणूक लढवणार नाहीत? काय आहे फॉर्म्युला?
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:58 PM

लखनऊः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना चांगलाच जोर आला आहे. भाजपने (BJP) आपल्या सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे आणि कॉंग्रेसनेपण जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. आशात, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्ष हा भाजपला टक्कर देणारा उत्तर प्रदेशचा महत्वाचा पक्ष आसूनही अखिलेश निवडणुक न लढवण्याचं काय कारण आहे? असा प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal) निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या (Mamta Banerjee) पराभवाने समाजवादी पक्षाचे प्रमुख घाबरले आहेत का? का भाजपच्या चक्रव्यूहात अडकायला नको म्हणून त्यांनी हो निर्णय घेतला? (Why Samajwadi party head Akhilesh Yadav not contesting UP Elections 2022)

भाजपची आक्रमक निवडणूक रणनीती

भाजपची राजकीय रणनीती ही कायम आक्रमक असते ज्यात विरोधक अडकतात. यामुळे विरोधकांना त्यांच्या रणनीतीसाठी, प्रचारासाठी वेळ मिळत नाही. अखिलेश यांना माहीत आहे की, काही छोट्या चुकीमुळेही अनेक वर्षांची मेहनत वाया जाईल. आतापर्यंतच्या वातावरणानुसार, योगी सरकारला टक्कर देण्याची क्षमता केवळ समाजवादी पक्षातच दिसून येत आहे. प्रियंका गांधी चांगला प्रचार कातयेत, पण उत्तर प्रदेशचमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती किती वाईट आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आघाडी टिकवण्यासाठी अखिलेश यांना निवडणूक लढवून भाजपच्या चक्रव्यूहात फसचायचे नाही, हे एक कारण आहे.

विधिमंडळाचे सदस्य होऊन मुख्यमंत्री पद

अखिलेश यांनी 2012 ची निवडणूकही लढवली नव्हती. पक्ष सत्तेत आल्यानंतर ते विधान परिषदेतून विधिमंडळाचे सदस्य होऊन मुख्यमंत्री झाले. याच फॉर्म्युल्याखाली 2022 ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय अखिलेश यांनी विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. बिहार आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांनीही हाच मार्ग स्वीकारला आहे. उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही विधीमंडळाच्या ऐवजी विधानपरिषदेतून विधानसभेत गेले.

अखिलेश यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

अखिलेश हे सपाचे अध्यक्ष आहेत आणि पक्षाचा सर्वात मोठा चेहरा आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्व 403 जागांवर सपा आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळेच अखिलेश यांनी आपल्या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव हे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलायम सिंह यांनी 2017 आणि 2019 ला प्रचार केला नाही. सपामध्ये अखिलेश यादव हे एकमेव स्टार नेता आहेत.

Other News

मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं, पाच मुद्द्यावर केला फोकस

Why Samajwadi party head Akhilesh Yadav not contesting UP Elections 2022

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.