Noida : आधी पत्नीचा गळा आवळला, मग आत्महत्या दर्शवण्यासाठी पंख्याला लटकवले, नोएडात दारुच्या नशेत पतीकडून महिलेची हत्या

नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीही अनिल दारु पित बसला होता. पत्नी शारदाने त्याला दारु पिण्यास विरोध केला. याचाच राग आल्याने अनिलने शालच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. पत्नीचा मृत्यू आत्महत्या दर्शवण्यासाठी आरोपीने त्याच शालने तिला पंख्याला लटकवले.

Noida : आधी पत्नीचा गळा आवळला, मग आत्महत्या दर्शवण्यासाठी पंख्याला लटकवले, नोएडात दारुच्या नशेत पतीकडून महिलेची हत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 6:31 PM

नोएडा : दारु पिण्यास पत्नीने विरोध केला म्हणून दारुड्या नवऱ्या(Husband)ने गळा आवळून पत्नी(Wife)ची हत्या केल्याची घटना नोएडातील कोतवाली सेक्टर 142 मधील शहदरा गावात घडली आहे. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पंख्याला लटककवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. शारदा असे मयत महिलेचे नाव असून अनिल उर्फ सोनू असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या माहेरच्या लोकांनी कोतवाली पोलिसात हत्येची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सोमवारी एक्स्प्रेस वे जवळ पोलिसांनी आरोपीला अटक केले. (Wife murdered by husband for opposing drinking in Noida, Accuse arrest)

आरोपी पतीला दारुचे व्यसन होते

मयत शारदा आणि अनिल यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत शहदरा गावात राहत होती. अनिल हा एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी सुटली होती. त्यामुळे सध्या तो बेरोजगार होता. अनिलला दारुचे व्यसन होते. नोकरी सुटल्यानंतर अनिल वारंवार लोकांकडून दारुसाठी उधार पैसे घ्यायचा. अनिल आणि शारदा यांना 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत. अनिल दारुडा असल्याने ही दोन्ही मुलांना शारदाने हरिद्वार येथे आपल्या बहिणीकडे ठेवले होते.

दारु पिण्यास विरोध केला म्हणून पत्नीचा गळा आवळला

नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीही अनिल दारु पित बसला होता. पत्नी शारदाने त्याला दारु पिण्यास विरोध केला. याचाच राग आल्याने अनिलने शालच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. पत्नीचा मृत्यू आत्महत्या दर्शवण्यासाठी आरोपीने त्याच शालने तिला पंख्याला लटकवले. शारदाच्या मृत्यूची बातमी मिळताच तिचे नातेवाईक शहदरा येथे पोचले. तेथे पोहचल्यानंतर शारदाच्या नातेवाईकांना अनिलच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात मयत महिलेच्या भावाने कोतवाली सेक्टर 142 पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात शालही जप्त केली आहे.

यवतमाळमध्ये घरगुती वादातून सुनेने केली सासूची हत्या

घरगुती वादातून सुनेने सासूवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी यवतमाळमधील आर्णी शहरात घडली. आशाबाई किसनराव पोरजवार असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आशाबाई या आपला थोरला मुलगा अरविंदसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. नेहमाप्रमाणे सोमवारी आशाबाईचा मुलगा अरविंद आणि एक हमाल बाहेर भाजी विक्रीसाठी जाण्याची तयारी करीत होते. तर आशाबाई आणि सून सरोज घरात होत्या. यावेळी अचानक गोळीचा आवाज आल्याने मुलाने आणि शेजाऱ्याने घरात जाऊन पाहिले असता आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना तात्काळ यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. (Wife murdered by husband for opposing drinking in Noida, Accuse arrest)

इतर बातम्या

Nashik | स्कूल बस जळून खाक; विद्यार्थ्यांसह 2 शिक्षिका सुखरूप, कशी घडली अनर्थकारी घटना?

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचं परमबीर सिंग यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र चांदीवाल आयोगाकडे सादर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.