घरगुती LPG सिलिंडरच्या किमती 1 जूनपासून वाढणार? 1100 च्या पुढे जाणार किमती?गृहिणींचं बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता

ही दरवाढ झाल्यास सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास सहन कारावा लागणार असल्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सावधगिरीची उपाययोजना म्हणून या वेळेचा गॅस सिलिंडर ३१ तारखेच्या आतच बुक करावा, तूर्तास एवढाच पर्याय ग्राहकांच्या हाती आहे.

घरगुती LPG सिलिंडरच्या किमती 1 जूनपासून वाढणार? 1100 च्या पुढे जाणार किमती?गृहिणींचं बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता
गॅस सिलिंडरचे नवे दर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 9:11 PM

नवी दिल्ली महागाईच्या वणव्यात आणखी एक चिंताजनक बातमी आहे. एलपीजी सिलिंडरचे दर येत्या १ जूनपासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी हे दर ११०० रुपयांच्या पुढे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गॅसच्या कंपन्या दर महिन्यात एक तारखेला दरनिश्चिती करतात. त्यामुळे एक तारखेला याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करताना सिलिडरच्या सबसिडीबाबतही निर्णय जाहीर केला होता. केंद्र सरकारने १२ सिलिंडरसाठी २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिलिंडरचे दर कमी होताना दिसत नाहीयेत. आता ही दरवाढ झाल्यास सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास सहन कारावा लागणार असल्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सावधगिरीची उपाययोजना म्हणून या वेळेचा गॅस सिलिंडर ३१ तारखेच्या आतच बुक करावा, तूर्तास एवढाच पर्याय ग्राहकांच्या हाती आहे.

कसे ठरतात गॅस सिलिंडरचे दर

भारतातील गॅसचा पुरवठा हा निर्यातीवर अवलंबून आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारीतल किमतीनुसार हे दर निश्चित केले जातात. रशियायुक्रेन युद्धाचा परिणामही गेल्या काही काळात इंधन आणि गॅसच्या किमंतीवर झालेला दिसतो आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या कोणत्या दराला एलपीजीची विक्री करतात त्यावर एलपीजी गॅसचे दर अवलंबून असतात. या मूळ किमतीवर देशात कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च आणि विमा यासारख्या इतर घटकांचाही भार वाढतो.

हे सुद्धा वाचा

महागाईचा उच्चांक

गेल्या काही काळापासून देशात महागाईचा भडका उडालेला दिसतो आहे. अन्नधान्य, तेल, भाज्या, फळभाज्या यांच्या किमतीही सातत्याने वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकरने उपाययोजना करुनही महागाई अटोक्यात येताना दिसत नाहीये. शेजारील पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांत तर महागाईमुळे सत्तांतरे झाल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.