IAS pooja Singhal:कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीच्या प्रकरणात आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि पती माफीचे साक्षीदार होणार? पूजा सिंघल सध्या अटकेत

त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक झालेली नाही. सात दिवस त्यांची चौकशी सुरु आहे, मात्र त्यांना अटक होणार का, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अशा स्थितीत अभिषेक झा हे माफीचे साक्षीदार होणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. अद्याप याला अधिकाऱ्यांच्या पातळीवर अधिकृत दुजोरा कुणीही दिलेला नाही.

IAS pooja Singhal:कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीच्या प्रकरणात आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि पती माफीचे साक्षीदार होणार? पूजा सिंघल सध्या अटकेत
pooja singhal and abhishekImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 9:43 PM

रांची कोट्यवधींच्या मनी लाँडिंग (money laundering) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) आणि त्यांचे पती अभिषेक झा यांची सध्या ईडी(ED)कडून कठोर चौकशी सुरु आहे. पूजा सिंघल यांना अटक झाली असली तरी अद्याप त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक झालेली नाही. सात दिवस त्यांची चौकशी सुरु आहे, मात्र त्यांना अटक होणार का, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अशा स्थितीत अभिषेक झा हे माफीचे साक्षीदार होणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. अद्याप याला अधिकाऱ्यांच्या पातळीवर अधिकृत दुजोरा कुणीही दिलेला नाही. मात्र गोड्डाचे भाजपा खासदार शशिकांत दुबे यांनी याबाबत एक ट्विट केल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

पल्स हॉस्पिटलचे एमडी आहेत अभिषेक झा

आय़एएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सुमारे २६ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केलेली आहे. यात पल्स हॉस्पिटलमधील छापेमारीतही ईडीच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्रे लागल असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशीची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात त्यांचे सीए सुमन कुमार यांना अटक झाल्यानंतर, एक आठवडाभर पूजा यांचे पती अभिषेक झा यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. दररजो सकाळी ते ईडीच्या कार्यालयात येतायते. दिवसभर त्यांची चौकशी होतेय, मात्र संध्याकाळी ते घरी परतत आहेत. यापूर्वी पूजा सिंघल यांना चौकशीला बोलावल्यानंतर दुसऱ्या दिवशीच अटक करण्यात आली होती.

अभिषेकच होणार माफीचे साक्षीदार?

अभिषेक झा यांना आत्तापर्यंत या प्रकरणात अटक न झाल्याने, ते या प्रकरणात माफीचे साक्षीदार होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. अद्याप या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार का, की त्यांना माफीचे साक्षीदार करणार, याचा निष्कर्ष आत्ताच काढणे हे थोडे घाईचे ठरण्याची शक्यता आहे. ईडीची टीम सध्या या प्रकरणात अधिकाधिक पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.

कोट्यवधींचा भ्रष्टाचार, अनेक मोठे मासे

हे एकूण प्रकरण मोठ्या भ्रष्टाचाराचे आहे. पूजा यांचे से सुमनकुमार यांच्याकडून १९ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. तर १५० कोटींच्या मालमत्तेची माहिती मिळाली होती. यात अजून अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पूजा सिंघल आणि त्यांचे पती माफीचे साक्षीदार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.