देशातील कोरोना काळातील सर्वात वाईट महिना; एप्रिलमध्ये 66 लाख नव्या रुग्णांची भर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा हाहाकार वाढल्याने एप्रिल महिना कोरोना काळातील सर्वात वाईट महिना ठरला आहे. (Worst month of Corona period in India)
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा हाहाकार वाढल्याने एप्रिल महिना कोरोना काळातील सर्वात वाईट महिना ठरला आहे. एकट्या एप्रिलमध्ये देशात 66 लाख रुग्ण सापडले आहेत. गेल्या सहा महिन्यात कोरोनाच्या जेवढ्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापेक्षा हा आकडा कितीतरी मोठा असून त्यावरून देशात कोरोनाचं संकट किती मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे हे दिसून येत आहे. (Worst month of Corona period in India)
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4,01,993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,91,64,969 वर गेला आहे. मार्च अखेरीपर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,21,49,335 एवढी होती. परंतु एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हा आकडा वाढल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
5 एप्रिलनंतर लाखांच्यावर रुग्ण
देशात 5 एप्रिलनंतर दिवसाला एक लाखाहून अधिक नवे रुग्ण सापडायला लागले. 15 एप्रिलपर्यंत ही संख्या दिवसाला दोन लाखाच्यावर गेली. तर 22 एप्रिलनंतर ही संख्या दिवसाला तीन लाखांच्यावर गेली. गेल्या चार आठवड्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली.
गेल्या 24 तासात 4 लाखाहून अधिक रुग्ण
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 32 लाखांच्यावर गेली आहे. शनिवार सकाळी 8 वाजता जारी करण्या आलेल्या आकडेवारीनुसार 24 तासात देशात 4,01,993 नवे रुग्ण सापडल्याने देशातील रुग्णांची संख्या 1,91,64,969 वर गेली आहे. तर 24 तासात देशात 3,523 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 2,11,853 एवढी झाली आहे.
सक्रिय रुग्ण 32 लाखांहून अधिक
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 32,68,710 एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर कमी झाला असून 81.84 टक्के झाला आहे. देशातील कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 1,56,84,406 एवढी झाली आहे. आणि रुग्णांचा मृत्यू दर 1.11 टक्के झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी 20 लाखांच्या पुढे गेली होती. ही संख्या 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाख झाली होती. (Worst month of Corona period in India)
महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 1 May 2021 https://t.co/eG83Jcs9Yz #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2021
संबंधित बातम्या:
22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा
Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू
कोरोनापासून वाचायचंय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय?, ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा…
(Worst month of Corona period in India)