भय इथले संपले नाही!, ‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका; ‘या’ राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी

महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवलेली असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. (Yaas cyclone: IMD Expects Another Cyclone 'Yaas' In The Bay Of Bengal)

भय इथले संपले नाही!, 'तौक्ते'नंतर आता 'Yaas' चक्रीवादळाचा धोका; 'या' राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी
नुकताच, भूविज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार, उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची वार्षिक वारंवारता 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1951 ते 2018 पर्यंत कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन दशकांत, मान्सूननंतर अत्यंत तीव्र चक्रीवादळांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 1:23 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवलेली असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता Yaas चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने काही राज्यांमध्ये Yaas चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांना अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. (Yaas cyclone: IMD Expects Another Cyclone ‘Yaas’ In The Bay Of Bengal)

भारतीय हवामान खात्याने Yaas वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी त्यांचं वादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ तयार झाल्यास त्याला ‘यस’ चक्रीवादळ संबोधलं जाईल. या वादळाला ओमानने ‘यस’ हे नाव दिलं आहे. आपल्या पट्ट्यात या वादळाचे संकेत आल्यास त्यावर अधिक भाष्य करता येणार असल्याचं आयएमडीच्या सुनीता देवी यांनी सांगितलं.

ओडिशा, अंदमान, बंगालला धोका?

23 आणि 24 मे रोजी वादळ तयार झाल्यानंतर 27 ते 29 मे दरम्यान लँडफॉलचे कारण बनेल. त्यामुळे अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या वादळाचा फटका बसणार आहे. यावेळी ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

वादळासाठी परिस्थिती अनुकूल

समुद्र सपाटीचं तापमान एसएसटी बंगालच्या खाडीहून 31 डिग्रीवर आहे. सरासरी तापमानाच्या 1-2 डिग्रीच्यावर हे तापमान आहे. अशी परिस्थिती चक्रीवादळ तयार करण्यास अनुकूल असते, असं सुनीता देवी यांनी स्पष्ट केलं आहे.

तौक्तेचा सर्वाधिक फटका गुजरातला

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे. तौक्तेमुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांमध्येही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे. वृक्षही उन्मळून पडले आहेत. त्यामुळे या तिन्ही राज्यातील वादळाचा फटका बसलेली गावं आजही अंधारात आहेत. वादळामुळे गुजरातमध्ये 40 हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. 16,500 कच्ची घरेही पडली आहेत. 2400 हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. 122 कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. येत्या 20 मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Yaas cyclone: IMD Expects Another Cyclone ‘Yaas’ In The Bay Of Bengal)

संबंधित बातम्या:

Cyclone Tauktae: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात, दीवमध्ये; वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

LIVE | तोक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे 15 कोटीहून अधिकचे नुकसान

Monsoon Update | मुंबईसह उपनगरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

(Yaas cyclone: IMD Expects Another Cyclone ‘Yaas’ In The Bay Of Bengal)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.