पोलीस अ‍ॅक्सनमोडमध्ये, मशिदीवरुन काढले लाउडस्पीकर

illegal loudspeakers remove | उत्तर प्रदेशातील योग सरकार धार्मिक स्थळावरील अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई सुरु केली आहे. सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी ही कारवाई झाली. या कारवाई दरम्यान पोलिसांना सहकार्य मिळाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

पोलीस अ‍ॅक्सनमोडमध्ये, मशिदीवरुन काढले लाउडस्पीकर
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 7:43 PM

लखनऊ, दि. 27 नोव्हेंबर | उत्तरप्रदेश राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर पोलीस अ‍ॅक्सनमोडमध्ये आले आहेत. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर लावलेले अवैध लाउडस्पीकर सोमवारी विशेष मोहीम राबवून काढण्यात आले. लाउडस्पीकर काढण्यासाठी पोलिसांना नागरिकांनीही सहकार्य केले. धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे काढण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील योगी सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात ही कारवाई करण्यात आली.

एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाई

पोलिसांनी राज्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई केली. त्यात मशीदीप्रमाणे मंदिरांचाही समावेश आहे. लखनऊमधील तकियावाली मशिद, गाजीपूरमधील अनेक भागातील लाउडस्पीकर काढण्यात आले. लखनऊ जिल्ह्यांत 503 ठिकाणी लाउडस्पीकर काढण्यात आले. लखनऊमध्ये पोलीस अधीक्षक बृजेशकुमार श्रीवास्तव यांनी आपल्या टीमसोबत सकाळी पाच वाजताच कारवाई सुरु केली. यावेळी मशीद आणि मंदिरावर लाउडस्पीकरसंदर्भातील नियमांचे पालन होत नसताना दिसले. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्यांनी कारवाई सुरु केली.

इतर ठिकाणी कारवाई

कानपूर शहरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. कानपूरचे पोलीस आयुक्त आर.के. स्वर्णकार यांनी विशेष अभियान राबवून लाऊडस्पीकर काढले. चित्रकूटमध्ये कारवाई करण्यात आली. फर्रुखाबादमध्ये 37 ठिकाणी कारवाई झाली. ललितपूर येथील तीन मशीदवरुन लाउडस्पीकर काढले. कन्नौजमध्ये 20 मशीदींवर कारवाई झाली. फतेहपूरमध्ये 14 तर औरैयामध्ये 19 ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केले.

महाराष्ट्रात मनसेची मागणी

उत्तर प्रदेशातील योग सरकार धार्मिक स्थळावरील अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई करत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकवेळा ही मागणी केली. परंतु ठोस कारवाई झाली नाही. राज ठाकरे यांनी लाउडस्पीकर न काढले गेल्यास हनुमान चालीसा करण्याचे म्हटले होते. यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही ठिकाणी कारवाई झाली होती. परंतु राज्यात सर्वत्र अजून अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई झालेली नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.