AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुनोमध्ये जन्मलेल्या चार चित्यांना तुम्हीही देऊ शकता नाव, नेमके काय करावे लागणार

कुनोमध्ये जन्मलेले चित्ता भारतीय आहेत. यामुळे भारत सरकारने या भारतीय चित्तांची नावे सूचवण्याचे आवाहन केले आहे. या चित्त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी अशी तुमची इच्छा आहे? तर मग फक्त इतके करा.

कुनोमध्ये जन्मलेल्या चार चित्यांना तुम्हीही देऊ शकता नाव, नेमके काय करावे लागणार
| Updated on: Apr 09, 2023 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. देशाला गेल्या 70 वर्षांत जे हवे होते ते आता घडले आहे. भारतात 1947 मध्ये शेवटचा चित्ता दिसला होता. यानंतर चित्ता नामशेष झाला. सरकारने चित्ते नामशेष झाल्याची घोषणा केली. त्यानंतर 2022 चा सप्टेंबर महिन्यात नामिबिया येथून 8 चित्ते आणण्यात आले. या आठ चित्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवले. त्यात आनंदाची बातमी यातील एका चित्ताने चार पिल्लांना जन्म दिला आहे. कुनोमध्ये जन्मलेले चित्ते परदेशी नसून भारतीय आहेत. यामुळे भारत सरकारने या भारतीय चित्तांची नावे सूचवण्याचे आवाहन केले आहे. या चित्त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी अशी तुमची इच्छा आहे? तर मग फक्त इतके करा.

काय आहे प्रक्रिया

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत तुम्ही कुनो येथे जन्मलेल्या 4 चित्त्यांची नावे तुम्ही देऊ शकता. MyGovIndia या वेबसाइटवर ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ट्विटरवरही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. स्पर्धा 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे अन् 30 एप्रिलपर्यंत सुरु असेल. चला, आता त्यात सहभागी होण्याची प्रक्रिया समजून घेऊया…

  • प्रथम तुम्हाला https://www.mygov.in/task/name-four-newly-born-cheetah-cubs-kuno/ वेबसाइटवर क्लिक करावे लागेल.
  • MyGovIndia वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तयार ठेवा. ते सर्व माहिती भरल्यानंतर तुमचे खाते MyGovIndia वर उघडेल.
  • MyGovIndia वर खाते उघडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आवडीचे नाव चित्त्यांना देऊ शकता.
  • नाव दिल्यानंतर, सेव्ह बटणावर क्लिक करताच तुमचे नाव वेबसाइटवर सेव्ह होईल.
  • आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी या चित्तांना नावे दिली आहेत.

काय आहेत नावे

कोणी चित्यांचे नाव राम ठेवण्यास सांगितले आहे, तर कोणी स्वातंत्र्यसैनिकांचे नाव सुचवले आहे.स्पर्धा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अशा स्थितीत आणखी हजारो नावे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार नावांची निवड केली जाईल, त्यात तुम्ही सूचवलेले नावही असू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.