कॉलेजची विद्यार्थीनी बनली जगातील सर्वात युवा अब्जाधीश, कोण आहे लिविया वोइगट
फोर्ब्सच्या युवा अब्जाधीशांच्या यादीत भारतातील उद्योजक आहेत. झरोदाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत अव्वल आहे. यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल आहेत. भारतात आता अब्जाधिशांची संख्या वाढत आहे.
फोर्ब्सने नुकतेच 2024 मधील ‘फोर्ब्स बिलेनियर्स लिस्ट’ जाहीर केली आहे. या यादीत जगातील सर्वात कमी वयाची विद्यार्थीनी अब्जाधीश झाली आहे. ब्राझीलमधील 19 वर्षीय लिविया वोइगट (Livia Voigt) या यादीत सर्वात कमी वयाची अब्जाधीश ठरली आहे. या यादीत 25 युवा अब्जाधिशांचा समावेश आहे. त्यांचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 19 वर्षीय लिविया वोइगट विद्यापीठात मानसशास्त्राच्या अभ्यास करत आहे. ती लॅटीन अमेरिकेतील सर्वात मोठी इलेक्ट्रीक मॅन्यूफॅक्चर कंपनीची WEG ची शेअर होल्डर आहे. तिची संपत्ती तब्बल 1.1 अब्ज डॉलर आहे. लिविया वोइगट हिचे आजोबा वर्नर रिकार्डो यांनी या कंपनीची स्थापना केली होती. WEG कंपनीचे जगभरातील दहा देशांमध्ये प्लॅन्ट आहेत.
लिविया वोइगट कोण आहे?
लिविया हिने अब्जाधीशांच्या यादीत क्लेमेंट डेल वेक्चिओ हिला मागे सोडले आहे. ती लिविया केवळ दोन महिने मोठी आहे. ती सध्या ब्राझीलमधील विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्याकडे अद्याप WEG कंपनीचे कोणतेही शिक्षण नाही. लिवियाकडे कंपनीचा 3.1 वाटा आहे. तिची मोठी बहीण डोरा वॉयज अब्जाधिशांच्या यादीत आहे. तिचाही लिवियाप्रमाणे कंपनीत 3.1 वाटा आहे. ती सुद्धा अजून कोणत्याही पदावर नाही.
फोर्ब्सच्या यादीत 2,781 अब्जाधीश
फोर्ब्सच्या या यादीत 2,781 अब्जाधीश आहे. ही संख्या मागील वर्षी पेक्षा 141 ने जास्त आहे. अब्जाधिशांमध्ये अमेरिकेतील संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक चीनचा आहे. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 813 अब्जाधीश आहे. चीनमध्ये 473 अब्जाधीश तर भारतमध्ये 200 अब्जाधीश आहे.
भारतातून सर्वात युवा कोण
फोर्ब्सच्या युवा अब्जाधीशांच्या यादीत भारतातील उद्योजक आहेत. झरोदाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत अव्वल आहे. यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल आहेत. भारतात आता अब्जाधिशांची संख्या वाढत आहे.