आता ट्रेन तिकिट महागणार, CSMT सह ‘या’ रेल्वे स्थानकांवर द्यावे लागणार जास्त पैसे

ज्याप्रमाणे विमानतळांवर युजर चार्ज (User Charge) आकारला जातो त्याप्रमाणे आता देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरही (Railway Stations) वापरकर्त्याकडून शुल्क आकारला जाणार आहे.

आता ट्रेन तिकिट महागणार, CSMT सह 'या' रेल्वे स्थानकांवर द्यावे लागणार जास्त पैसे
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:58 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात आता सर्वसामान्यांना आणखी आर्थिक फटका बसणार आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता लवकर ट्रेनची तिकिटे महाग होणार आहेत. ज्याप्रमाणे विमानतळांवर युजर चार्ज (User Charge) आकारला जातो त्याप्रमाणे आता देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरही (Railway Stations) वापरकर्त्याकडून शुल्क आकारला जाणार आहे. (your train ticket is going to be expensive user charge will be taken at these 120 stations)

येत्या दोन आठवड्यांत वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा शुल्क 10-50 रुपयांदरम्यान असू शकतो. वापरकर्त्याने शुल्क आकारल्यानंतर प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, येत्या दोन आठवड्यांत काही रेल्वे स्थानकांवर यूजर चार्ज लावण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेऊ शकतं. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) वेगवेगळ्या वर्गातील प्रवाश्यांसाठी 10 ते 50 रुपयांपर्यंत वापरकर्ता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. फस्ट क्लासच्या प्रवाशांकडून अधिक वापरकर्ता शुल्क आकारला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यूजर्स चार्ज किती स्टेशनवर वापरायचा याविषयी रेल्वे मंत्रालय निर्णय घ्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 120 प्रमुख स्थानकांवर वापरकर्ता शुल्क आकरण्यात येईल. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), नागपूर, तिरुपती, चंदीगड, ग्वाल्हेर, पुडुचेरी आणि साबरमती यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली आणि मुंबईसाठी बोलीची तारीख 18 डिसेंबर आणि 15 डिसेंबर करण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

सरकारचं आयात धोरण, शेतकऱ्यांना पुन्हा फटका; डाळींचे दर घसरले

‘8 डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल’

(your train ticket is going to be expensive user charge will be taken at these 120 stations)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.