ठाकरे सरकारची स्वत:च्या आमदारावर मोठी मेहेरबानी! अनधिकृत बांधकाम प्रकरणी दंडाची कोट्यवधींची रक्कम माफ
बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा दंड आणि व्याजही माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला...आणि इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही ठाणे महापालिकेला देण्यात आलेत. मात्र, दंड आणि व्याजाची रक्कम 4 कोटी 33 लाख नसून 21 कोटी असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्यांनी केलाय. तत्पूर्वी सोमय्या यांनी एक पत्रक काढून जोरदार टीका केलीय.
मुंबई : दोन दिवसांपासून राज्यात चर्चा आहे ती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीची! गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (State Cabinet Meeting) यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर यावरून परखड टीका केली जात आहे. सरनाईकांना 3 कोटी 33 लाख 96 हजारांचा दंड आकारला. त्यापैकी फक्त 25 लाखच सरनाईकांनी भरले. त्यामुळं दंड आणि व्याज असे मिळून 4 कोटी 33 लाख 97 नोटीस सरनाईकांना बजावण्यात आली.
दरम्यान, बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा दंड आणि व्याजही माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला…आणि इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही ठाणे महापालिकेला देण्यात आलेत. मात्र, दंड आणि व्याजाची रक्कम 4 कोटी 33 लाख नसून 21 कोटी असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्यांनी केलाय. तत्पूर्वी सोमय्या यांनी एक पत्रक काढून “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 2008-2009 मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील 114 सदनिकाधारकांची फसवणूक केली. 5 मजले अनधिकृत बांधले. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार. परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात टीकास्त्र डागलं आहे. तर ठाणे महापालिकेनंच प्रस्ताव पाठवला, त्याला एकमतानं मंजुरी दिली, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं म्हणणंय.
Pratap Sarnaik Vihang Garden illegal construction
Lokayukta Order of 4 January 2021 says
“Developer has paid only ₹25 lacs. Ballance amount of ₹3,33,96842 (plus 18% interei since 25/10/2013) must be recovered by Thane Municipal Corporation as per MRTP Act@BJP4Maharashtra pic.twitter.com/EDLOhYg5zU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2022
ठाण्यात सरनाईकांचं साम्राज्य पाहा
रिक्षा चालक… ते बांधकाम व्यावसायिक… आणि बांधकाम व्यावसायिक ते आमदार… असा प्रताप सरनाईकांचा प्रवास आहे. ठाण्यात सरनाईकांचं साम्राज्य कसं आहे, त्यावर एक नजर टाकुयात. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सरनाईकांची एकूण संपत्ती 126 कोटी इतकी दाखवण्यात आली. ठाण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सरनाईकांचा दबदबा आहे. विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रविवासी प्रकल्प. ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री स्टार हॉटेल. विहंग ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी, ज्यात स्वीमिंग पूल, हेल्थ क्लब अशा सोयींचा समावेश आहे.
दंड आणि व्याज माफ करण्याची गरज होती का? भाजपचा सवाल
त्यामुळं सरनाईकांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात ठोठावण्यात आलेला दंड आणि व्याज माफ करण्याची गरज होती का ?, असा सवाल भाजपचा आहे आणि ठाणे महापालिकेच्या आवारात भाजपनं आंदोलनंही केलंय. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीनं ठाण्यात सरनारईकांच्या घरी आणि कार्यालयावर मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकले होते. सरनाईकांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांच्या घरी आणि कार्यालयातही झाडाझडती झाली होती. तासांसाठी विहंग सरनाईकांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यातही घेतलं होतं. ते प्रकरण अजूनही संपलेलं नाही. त्यातच आता अनधिकृत बांधकामाप्रकरणी जो दंड माफ करण्याची मेहेरबानी ठाकरे सरकारनं आपल्याच आमदारांवर दाखवलीय..त्यामुळं सरनाईक पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
इतर बातम्या :