लहान मुलं, युवा आणि गर्भवती महिलांनाही कोरोना, ही लाट जास्त धोकादायक, तज्ज्ञांचा दावा

दुसऱ्या लाट लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुण वर्ग यांच्यासाठी देखील ही लाट धोकादायक आहे, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतोय (Corona second wave dangerous than first wave)

लहान मुलं, युवा आणि गर्भवती महिलांनाही कोरोना, ही लाट जास्त धोकादायक, तज्ज्ञांचा दावा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:50 PM

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. मात्र, आता दुसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुण वर्ग यांच्यासाठी देखील ही लाट धोकादायक आहे, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतोय. या वर्गातील अनेकांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे (Corona second wave dangerous than first wave).

तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात?

दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाचे ज्येष्ठ डॉक्टर सुरेश कुमार यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन चिंता व्यक्त केली. देशात कोरोनाची दुसरी लाट आधीच्या लाटेपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. गेल्या आठवड्यात 20 रुग्ण दाखल झाले होते. मात्र आता त्याची संख्या 170 वर येऊन पोहोचली आहे, अशी माहिती सुरेश कुमार यांनी दिली (Corona second wave dangerous than first wave).

पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांमध्ये वयस्कर रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र, यावेळी तरुण वर्ग, लहान मुलं, गर्भवती महिला यांनाही मोठ्या प्रमाणात बाधा होताना दिसत आहे. ही एक चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दुसरीकडे हार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कंफडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन ऑफ एशियाचे प्रेसिडेंट डॉ. केके अग्रवाल यांनी लहान मुलं, महिला यांच्यात कोरोनाची लक्षणे कमी आढळतात. पण त्यांनी सावधानता बाळगावी, अशी माहिती दिली आहे. याशिवाय कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली तर तातडीने स्वत:ला आयसोलेट करुन घ्यावं, असा सल्ला केके अग्रवाल यांनी दिला आहे.

80 टक्के बाधितांमध्ये लक्षणं नाहीत

राज्यात कोरोना संसर्गाचा वणवाच पेटलेला बघायला मिळत आहे. दररोज हजारो नागरिकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. मुंबईतही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. मात्र, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या 80 टक्के बाधितांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीयेत. पण त्या व्यक्तीमुळे इतराला संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. याच कारणामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं प्रचंड थैमान बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तर परिस्थिती जास्त भीषण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झालीय. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा : Nagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.