AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचं ‘हरवला आहे’, तर नितेश राणेंचं ‘गाडलाच’! तर नारायण राणेंच्या टीकेला मलिक आणि देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर

जिल्हा बँकेची निवडणूक जिंकताच कोकणासह मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नारायण राणेंनीही आता पुढचं लक्ष्य राज्य सरकार असं सांगत, आता भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचा दावाही केला. राणेंच्या याच वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

शिवसेनेचं 'हरवला आहे', तर नितेश राणेंचं 'गाडलाच'! तर नारायण राणेंच्या टीकेला मलिक आणि देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
नवाब मलिक, नारायण राणे, शंभूराज देसाई
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 9:48 PM
Share

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurga District Bank Election) भाजप आणि पर्यायानं राणे पिता-पुत्रांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार झटका दिला. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकताच कोकणासह मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नारायण राणेंनीही (Narayan Rane) आता पुढचं लक्ष्य राज्य सरकार असं सांगत, आता भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचा दावाही केला. राणेंच्या याच वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिकांचा राणेंना टोला

नारायण राणे आणि भाजपाने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 25 मते 50 मते असतात. आता अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आाता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे, असा चोला मलिक यांनी राणेंना लगावलाय.

शंभूराज देसाईंचीही टीका

तर नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राणेंना दिलाय. त्याचबरोबर नारायण राणे हे बत्ताशावरचे पैलवान आहेत. ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत, अशी टीका देसाई यांनी केलीय.

शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार पोस्टर वॉर

राणे विरुद्ध महाविकास आघाडी असा शाब्दिक सामना रंगलेला असताना दुसरीकडे पोस्टरवॉरही जोरात सुरु आहे. आधी नितेश राणे यांचे हरवले आहेत, माहिती देणाऱ्याला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, अशा आशयाचे पोस्टर मुंबईत लागले होते. त्याला उत्तर देताना, नितेश राणेंनी फेसबूकवरुन एक पोस्टर पोस्ट केलं. त्यावर गाडलाच असं शिर्षक देऊन, शिवसेना नेते सतीश सावंत यांचा फोटोवर ते उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर नारायण राणेंचं पोस्टर व्हायरल होत आहे. यातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झालाय. राणेंच्या हातात वाघाच्या शेपूट असून, त्या वाघाला राणेंनी जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखलं, असं दाखवण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

‘नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत’, शंभुराज देसाईंचा जोरदार टोला

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.