ती सहा महिन्यांची गर्भवती, आधी तिच्यावर तालिबाननं गोळ्या झाडल्या नंतर चेहरा विद्रूप केला, अफगाण महिला दुहेरी कचाट्यात?

एका रिपोर्टनुसार अफगाणिस्तानातील सुमारे 90% टक्के महिलांनी एकदा तरी घरगुती हिंसाचाराचा अनुभव घेतलाय. 17 टक्के महिला लैंगिक हिंसा आणि 52 टक्के शारीरिक हिंसाचाराला बळी पडल्यात. जग अफगाण महिलांच्या हक्कांसाठी चिंतित आहे, परंतू अफगाण महिलांची अत्याचारातून सुटका कशी होणार हा मोठा प्रश्न आहेच.

ती सहा महिन्यांची गर्भवती, आधी तिच्यावर तालिबाननं गोळ्या झाडल्या नंतर चेहरा विद्रूप केला, अफगाण महिला दुहेरी कचाट्यात?
तालिबानच्या पहिल्या बळी ह्या महिला ठरतायत. त्यातही काम करणाऱ्या महिला टार्गेटवर आहेत
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 9:26 PM

अफगाण महिला(Afghan Women Trouble) सध्या दुहेरी कचाट्यात सापडलेल्या आहेत. एक तर तालिबान आणि त्यात पुन्हा पुरुषप्रधान अत्याचार. अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) एकीकडे शांततेच्या चर्चेचं ढोंग करतंय तर दुसरीकडे त्याचेच टोळके काबूल, गझनीच्या रस्त्यावर महिलांवर अत्याचार करताना दिसतंय. त्यातून ते गर्भवती महिला मुलांनाही सोडत नाहीयत. परिणामी अफगाण महिलांच्या सहनशीलतेचा स्फोट होताना दिसतोय. त्याचाच परिणाम म्हणून काबूलमध्ये गेल्या वीस एक दिवसात जे काही तालिबानला विरोध करणारे आंदोलन झाले त्यात दोन तीन मोर्चे हे अफगाण महिलांचे आहेत. अफगाण महिलाच आता लढतील अशी आशा जगभरात निर्माण होतेय.

आधी गोळ्या घातल्या नंतर चेहरा विद्रूप केला तालिबानच्या अत्याचाराच्या (Taliban torture) अनेक घटना आपण ऐकल्यात वाचल्यात. त्यात एकापेक्षा एक अशी क्रुरता भरलेली असते. वाचताना, ऐकताना आपल्या अंगावर काटा उभा राहातो. आता काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान महिलांच्या अधिकारांची रक्षा करेल असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं. पण हे सगळं बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असल्याचं दिसतंय. कारण घोर प्रांतातल्या फिरोजकोहमध्ये जे घडलं त्यानं जगाचा थरकाप उडालाय. एका 6 महिन्याची गर्भवती असलेल्या पोलीस अधिकारी महिलेला तालिबानच्या टोळक्यानं आधी गोळ्या आणि नंतर तिचा चेहरा विद्रूप केला तोही स्क्रू-ड्रायव्हरनं. हे सगळं तालिबानच्या टोळक्यानं त्या महिलेच्या पती आणि लहान लेकरांसमोर केलं. काहीही झालं तरी तालिबान महिलांना कुठलेच अधिकार देणार नाही याचाच हा पुरावा. ती महिला फक्त पोलीस अधिकारी आहे, कामाला जाते म्हणून तिला तिच्या कुटुंबाच्यासमोर असं क्रूरपणे संपवलं गेलं.

गझनीमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानचं आणखी एक महत्वाचं शहर आहे गझनी. ह्याच शहरात खटेरा नावाची एक 33 वर्षांची महिला रहात होती. एके दिवशी कामावरुन परतत असताना तालिबानच्या टोळक्यानं तिला अडवलं आणि भोसकलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिचे डोळेही काढले. तिच्यावर अनेक वार केले. कशीबशी ही महिला दिल्लीला उपचारासाठी पोहोचली. तिच्यावर उपचार झाले. जीवानं वाचली पण डोळे कायमचे गेले. खटेराही त्यावेळेस दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या तालिबानच्या अत्याचाराबाबत म्हणतात- “तालिबानच्या दृष्टीने स्त्रिया माणूस नसून मांसाचा तुकडा आहेत, ज्यावर कोणत्याही प्रकारची क्रुरता करता येते. ते (तालिबान) आधी आमच्यावर अत्याचार करतात आणि मग कधी कधी मृतदेह चौका चौकात लटकवतात आणि कधीकधी स्त्रियांचे मृतदेह कुत्र्यांना खायला घालतात. ही शिक्षा इतरांना दाखवण्यासाठी. मी भाग्यवान होते की मी यातून वाचले. आज महिला तालिबानच्या भीतीपोटी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र जाळतायत, जेणेकरून त्यांना स्त्री शिक्षणाचा पुरावा मिळू नये. माझे नातेवाईकही त्यांच्या मुलींना तालिबानपासून वाचवण्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र जाळतायत.

फक्त काबूल नाही गावातही तेच काबूल, कंदहार, मजार ए शरीफ अशाच मोठ्या शहरात महिलांवर अत्याचार होतोय असं नाही तर दूर्गम डोंगर भागातही अफगाण महिला अत्याचाराच्या बळी ठरतायत. शहरातल्या घटना कमीत कमी उघड तरी होतात पण दुर्गम भागात कसा अत्याचार होतो, त्याचा तर सुगावाही लागत नाही. एका रिपोर्टनुसार अफगाणिस्तानातील सुमारे 90% टक्के महिलांनी एकदा तरी घरगुती हिंसाचाराचा अनुभव घेतलाय. 17 टक्के महिला लैंगिक हिंसा आणि 52 टक्के शारीरिक हिंसाचाराला बळी पडल्यात. जग अफगाण महिलांच्या हक्कांसाठी चिंतित आहे, परंतू अफगाण महिलांची अत्याचारातून सुटका कशी होणार हा मोठा प्रश्न आहेच.

शरीयतच्या आधारावर अत्याचार महिला मग कोणत्याही धर्मात असो, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी पुरुष मंडळी धार्मिती रितीरिवाजाचा आधार घेतात. अफगाण महिलाही त्याला अपवाद नाहीत. शरीयतच्या आधारावरच महिलांना कामाची, इतर गोष्टी करण्याची परवानगी दिली जाईल असं तालिबाननं जाहीर केलंय. पण ज्या पाकिस्तानच्या जीवावर तालिबान हे सगळं करतंय, त्या पाकिस्तानात तर असा कुठला शरीयतचा कायदा लागू केलेला नाही? तालिबानला इस्लामिक कट्टरवादाचा धडा शिकवणारे पाकिस्तान आपल्या देशात तालिबानचे राज्य का आणत नाही? पाकिस्तान तालिबानच्या शरिया नियमांच्या विरोधात आहे का? शरियतच्या नावाखाली पाकिस्तानने तालिबानला दिलेले समर्थन केवळ तिजोरी भरण्यासाठी आहे का? याचाही विचार तालिबानला करावा लागेल.

अखेरचा किल्लाही ढासळला, पंजशीरवर अखेर तालिबान्यांचा कब्जा; संपूर्ण अफगाण तालिबानमय

Video: पुणे महिला सरपंच मारहाण प्रकरणी ट्विस्ट, नव्या व्हिडीओनं सरपंच गोत्यात, आधी कानशिलात लगावल्याचा आरोप

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.