Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास

यमुनेच्या तीरावर वसलेल्या या बुराडी घाटाने दुर्देवाने आपल्याच पुत्रांना रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थ पडलेलं पाहिलंय (Story of Burari Ghat and Farmers protest)

Special story | 'बचेंगे तो और भी लढेंगे', पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 2:18 PM

नवी दिल्ली : संघर्ष! या तीन अक्षरी शब्दामध्ये लाखो मनांचा आक्रोश, हतबलता, निराशा आणि लढवय्या वृत्ती दडलेली आहे. कित्येकांच्या आयुष्यात हा संघर्ष पाचवीलाच पुजलेला असतो. या संघर्षात लढताना, त्याच्याशी दोन हात करताना अनेकांची हयातही निघून जाते. मात्र, संघर्ष एखाद्या आगीनगाडीच्या रुळासारखा कधीच न संपणारा वाटतो. अगदी तसंच काहीसं आज देशातील लाखो शेतकऱ्यांसोबत घडतंय. पंजाब, हरियाणासह देशभरातील लाखो शेतकरी 25 नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, ही प्रमुख मागणी घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. मात्र, केंद्र सरकारही आपल्या निर्णयावर ठाम आहे. याच कायद्यांमुळे आज शेतकरी विरुद्ध व्यवस्था असा संघर्ष निर्माण झाला आहे (Story of Burari Ghat and Farmers protest).

शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जलफवारे, अश्रूधुरांचे हल्ले सोसले. त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आलं. केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत शिरण्यापासून प्रचंड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांच्या या सहनशीलतेपुढे अखेर केंद्र सरकारलाही नमावं लागलं. केंद्र सरकारने दिल्लीच्या बुराडी येथील मैदानावर शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली. या परवानगीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाने नवा इतिहास रचला. विशेष म्हणजे इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर बुराडी आणि संघर्ष यांचं एक विशिष्ट समीकरण आहे. या जमिनीचा रक्तरंजित इतिहास वाचला तर आजही अंगावर शहारे येतात (Story of Burari Ghat and Farmers protest).

बुराडीचा इतिहास

यमुनेच्या तीरावर वसलेल्या या बुराडी घाटाने दुर्देवाने आपल्याच पुत्रांना रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थ पडलेलं पाहिलंय. तो काळ होता पानिपतच्या लढाईचा. एका बाजूला अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली याची सेना, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची, मराठ्यांची सेना. पानिपतची तिसरी लढाई सुरु होण्याआधी बुराडी घाटावर झालेला रक्तपात आजही डोळ्यांमध्ये पाणी आणतो. 10 जानेवारी 1760 ची पहाट बोराडी घाटावर रक्षण करत असलेल्या मराठा सैन्यासाठी प्रचंड आव्हानात्मक ठरली. गणिमांनी लाखोंच्या संख्येने अवघ्या चार हजार मराठा सैन्यावर अचानक हल्ला केला. सकाळची बोचरी थंडी आणि बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज ऐकून मराठा सैन्य जागी झाले. समोरुन गोळ्यांचा वर्षाव होताच इकडूनही तलवारी तळपल्या.

त्यावेळी मराठा सरदार जानराव बावळे यांच्यावर बोराडी घाटाच्या रक्षणाची जबाबदारी होती. अब्दालीची सेना यमुना पार करताच गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. जानराव बावळे यांनी शत्रूंची अफाट सेना बघितल्यानंतर तातडीने सरदार दत्ताजीराव शिंदे यांना अधिकच्या तुकड्यांसाठी निरोप पाठवला. दत्ताजीराव शिंदे यांनी वेळेचा विलंब न करता तीन तुकड्या शत्रूंच्या गराड्यात सोडल्या. दत्ताजीराव स्वत: तळपत्या तलवारीसह दुष्मणांशी दोन हात करायला निघाले. दत्ताजींनी कित्येक अफगाणींचे शीर धडापासून वेगळे केले. मात्र, अफगाण्यांकडे असलेल्या बंदुकांमुळे मराठा सैन्य कमी पडू लागलं. समोरुन गोळ्यांचा वर्षाव सुरु असताना मराठा सेना निधळ्या छातीने लढत राहीली. मात्र, या साहसात मराठा सैन्याची प्रचंड हानी झाली. अनेकजण मृत्यूमुखी पडले. कुणाच्या वडिलांना गोळी लागली तर कुणी पोटच्या मुलाला तडपताना पाहिलं.

अखेर एक अनपेक्षित बातमी दत्ताजी शिंदे यांच्या कानावर पडली. जानराव यांना गोळी लागली, जानराव गेले, या बातमीने दत्ताजी आणखी खवळले. ते जीवाची पर्वा न करता गनिमांवर तुटून पडले. अब्दालीने नजीब आणि कुतुबशाह यांच्यावर अफगाणी सैन्याचे नेतृत्व दिलं होतं. शिंदे यांना हाच नजीब दिसला. ते नजीबच्या दिशेला निघाले. वाटेत येणाऱ्या अफगाण्यांना तुडवत ते पुढे निघाले. मात्र, इतक्यात एक घात झाला. दत्ताजी यांच्या छातीवर बंदुकीची गोळी लागली. दत्ताजी जमिनीवर कोसळले. त्यांना जमिनीवर पडलेलं बघून नजीब आणि कुतूबशाह प्रचंड आनंदी झाले. ते दत्ताजींजवळ आले. यावेळी कुतुशाहने दत्ताजींना “बोलो पाटील… और लढोंगे?”, असा प्रश्न विचारला. यावर लगेच दत्ताजींनी निडरपणे “क्यों नही? बचेंगे तो औरभी लढेंगे”, असं उत्तर दिलं. दत्ताजींचं उत्तर ऐकताच कुतुबशाह आणखी चवताळला. त्याने दत्ताजींच्या छातीवर वार केले. दत्ताजींच्या हत्येनंतर पानिपतची तिसरी लढाई झाली. या तिसऱ्या लढाईत अफगाण आणि मराठा दोन्ही बाजूचे हजारो सैनिक मारले गेले.

सध्याची बुराडी, बोचरी थंडी आणि शेतकरी आंदोलन

1760 साली बुराडी घाटावर झालेल्या लढाईत आणि आजच्या शेतकरी आंदोलनात बोचरी थंडी हे साम्य आहे. मराठ्यांनी परकीयांच्या आक्रमणापासून भारतभूमीचा बचाव व्हावा या उद्देशाने लढा दिला. तर अब्दाली मराठ्यांपासून आपल्या साम्राज्याला धोका असल्याच्या भीतीतून भारतावर चालून आला. अफगाण आणि मराठा दोन्ही सैन्यामध्ये झालेली भयानक लढाई कधीही विसरता येणार नाही. अगदी तसंच शेतकरी आंदोलनाबाबत आजचं चित्र आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी बोचऱ्या थंडीत दिल्ली सीमेवर, बुराडी मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. सध्या आंदोलक शेतकरी शांत आहेत. ते शांततेच्या मार्गाने लढाई करत आहेत. मात्र, या शांततेचं रुपांतर विद्रोहात झालं तर केंद्र सरकारला हा विद्रोह आवरणं अवघड होऊन बसेल.

हेही वाचा : लॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.