AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंद झाला पुढे काय? राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी?; वाचा सविस्तर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काल महाराष्ट बंद पुकारला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. लखमीपूर येथील शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता. (will maharashtra government announce package for farmer in next week?)

बंद झाला पुढे काय? राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी?; वाचा सविस्तर
Maharashtra bandh
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 7:42 AM
Share

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काल महाराष्ट बंद पुकारला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. लखमीपूर येथील शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी बंद पुकारणारं महाराष्ट्र सरकार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार काय? असा सवाल केला जात आहे. राज्यातील ठाकरे सरकार शेतकऱ्यांना खरोखरच मदत करणार का? किती करणार? कधी करणार? यावर टाकलेला हा प्रकाश.

शंभर टक्के बंद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे चार शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलावर या हत्येचा आरोप असून त्याला अटकही झाली आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात बंद पुकारला. चांद्यापासून बांद्यापर्यंत या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलं होतं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी दुकाने बंद केले. अनेक ठिकाणी निदर्शने केले आणि काही ठिकाणी रास्ता रोकोही केला. काही ठिकाणी बंदला गालबोटही लागलं. हा अपवाद वगळता राज्यात शांततेत बंद पार पडला.

फडणवीस काय म्हणाले?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बंद पुकारणाऱ्या सरकारचं राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. या सरकारचं नाव बंद सरकार आहे, हे सत्तेत आल्यानंतर यांनी योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश उघडा होता, महाराष्ट्र बंद केला, आमचे छोटे दुकानदार, व्यावसायिक यांचे गाडे रुळावर येत असताना सरकारने बंद केला. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोजून दहा कार्यकर्ते हायवे रोखतात आणि पोलीस तमाशा बघतात, कारवाई करत नाहीत. एकूणच सरकार स्पॉर्नर दहशतवाद सुरु आहे. या सरकारला थोडी नैतिकता असेल तर महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल’, असं आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं होतं.

शेतकऱ्यांच्या मदतीवरून टोलवाटोलवी?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावर गोलमटोल उत्तर दिलं. मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली. त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत आणण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न केले पाहिजे, असा टोलाही लगावला.

या आठवड्यात पॅकेज जाहीर होणार?

आघाडी सरकार पुढच्या आठवड्यात पॅकेज जाहीर करू शकते. मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला म्हणजे कोकणच्या अतिवृष्टीनंतर मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी जो पाऊस झाला त्याचं पॅकेज जाहीर केलं जाऊ शकतं. ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशाच जिल्ह्यांसाठी पॅकेज जाहीर होईल. कायम दुष्काळी भागात अतिवृष्टी कधी झाली नव्हती. तिथे मोठी अतिवृष्टी झाली. त्या भागासाठी पॅकेज जाहीर केलं जाईल. या भागातील पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. ई-पीक पाहणीवर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जागेवर पंचनामा आणि शेतकऱ्यांनी पाठवलेले फोटो ग्राह्य धरून सरकार चार ते पाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर करेल. हे पुरेसं नाही. गेल्या आठवड्यात राज्याला जवळपास चार हजार कोटींचा जीएसटीचा हप्ता मिळाला आहे. ती रक्कम इकडे फिरवता येईल. त्यामुळे सरकारला कर्ज काढण्याची गरज पडणार नाही, असं राजकीय पत्रकार आणि विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.

भाजपला ताकद दाखवू दिली

महाविकास आघाडीने भाजपला आपली ताकद दाखवून दिली आहे. ज्या उत्तर प्रदेशात ही घटना घडली. त्या ठिकाणी मायावतीची बसपा काहीच करत नाही. अखिलेश यादव आंदोलन करून भाजपला हैराण करू शकतील. पण ते होताना दिसत नाही. मात्र, महाविकास आघाडीने बंद करून या सर्व पक्षांमध्ये बळ भरण्याचं काम केलं आहे. या आंदोलनाचे फायदे तोटे काय होतील हे आता सांगता येत नाही. पण भाजपच्या विरोधात एकत्र येऊ शकतो हा संदेश देशभर गेला तर प्रादेशिक पक्ष एक होतील. ईडी, आयटी, सीबीआयची भीतीही निघून जाईल, असं सांगतानाच भाजपला सामोरे जायचं, घाबरायचं नाही, असंच आज आघाडीने दाखवून दिलं आहे, असाही या बंदचा अर्थ काढता येऊ शकतो, असंही विवेक भावसार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार

रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट, बंद पाळून नागरिकांची भाजपला सणसणीत चपराक : नाना पटोले

Maharashtra Bandh LIVE News and Updates | लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच : संजय राऊत

(will maharashtra government announce package for farmer in next week?)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.