धोती पँट, स्मार्ट वॉच, कोल्हापुरी चप्पल.. आमिर खानच्या लेकीचा लग्नात वेगळाच लूक

नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर सर्व कुटुंबीय फोटोसाठी पापाराझींसमोर आले. नुपूर त्याच्या घरापासून विवाहस्थळापर्यंत धावत गेला होता. त्याच्या जॉगिंगचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. नोंदणी पद्धतीने लग्नानंतर येत्या 8 जानेवारी रोजी नुपूर आणि शिखरे यांनी उदयपूरमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.

| Updated on: Jan 04, 2024 | 8:47 AM
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बुधवारी 3 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी तिने लग्न केलं. मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडलं. यावेळी आमिर खानचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं.

1 / 6
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं हे लग्न इतर बऱ्याच लग्नसोहळ्यांपेक्षा खूप वेगळं होतं. म्हणून त्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. लग्नातील कपड्यांमुळेही या दोघांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातंय. नोंदणी पद्धतीने लग्न करताना नुपूर थेट जॉगिंगच्या कपड्यांमध्ये पोहोचला होता. त्याला पाहून नेटकरी थक्क झाले.

2 / 6
लग्नानंतर नुपूरने सूट परिधान केला होता. तर आयराने चोली, धोती पँट्स आणि त्यावर दुपट्टा असा आगळावेगळा लूक केला होता. हे दोघं पापाराझींसमोर फोटोसाठी आले तेव्हा त्यांचा हा संपूर्ण लूक पहायला मिळाला. यावेळी दोघांनीही कोल्हापुरी चप्पल घातली होती.

3 / 6
नुपूर त्याच्या घरापासून विवाहस्थळापर्यंत जॉगिंग करत आला होता. वधू हा घोड्यावर बसून वरात घेऊन लग्नमंडपात येतो. मात्र यावेळी असं काहीच झालं नव्हतं. त्याच स्लीव्हलेस टी-शर्ट आणि हाफ पँटवर तो नोंदणी पद्धतीने लग्नासाठी स्टेजवर पोहोचला होता.

4 / 6
लग्नात वधूच्या हातात सहसा बांगड्या पहायला मिळतात. मात्र आयराने मनगटावर स्मार्टवॉच घातलं होतं. तिचा एकंदर लूक काहींना पसंत पडला नाही. तर सेलिब्रिटींच्या टिपिकल लग्नाचा ट्रेंड मोडल्याचं कौतुकसुद्धा काही नेटकरी करत आहेत. लग्न हे कपडे, दागिने, लूक, सजावट यांबद्दल नसून ते एकमेकांच्या नात्याबद्दल आणि प्रेमाबद्दल असतं, असंही काहींनी म्हटलंय.

5 / 6
नोंदणी पद्धतीने लग्नानंतर येत्या 8 जानेवारी रोजी आयरा आणि नुपूर हे उदयपूरमध्ये ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे.

6 / 6
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.