कोरोनानंतरच्या काळापासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. यामध्ये अनेक चित्रपट हे बिग बजेटचे होते. यामध्ये आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट देखील आहे.
आमिर खानचा लाल सिंह चड्ढाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरली. लाल सिंह चड्ढासाठी आमिर खानने प्रचंड अशी मेहनत घेतली होती. तब्बल 14 वर्ष हा चित्रपट बनवायला लागली होती.
लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान प्रसिध्दीपासून थोडा दूर गेलाय. मात्र, नुकताच सोशल मीडियावर आमिर खानचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असून हे फोटो चाहत्यांना नक्कीच अस्वस्थ करणारे आहेत.
थकलेले शरीर, पांढरी दाढी आणि चेहऱ्यावर टेन्शन असलेले आमिर खानचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून कोणीच विश्वास करणार नाही की, हे आमिर खानचे फोटो आहेत.
लाल सिंह चड्ढा चित्रपट पूर्णपणे फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान तुटलेला दिसतोय. सुरूवातीला या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.