चेन्नईमधील मंदिरात पार पडलं ऐश्वर्याचं लग्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ऐश्वर्याने 2013 मध्ये 'पट्टतू यानई' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तर उमापतीने 2016 मध्ये 'अधगप्पट्टथु मगजनंगले' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

| Updated on: Jun 13, 2024 | 12:56 PM
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सर्जाची मुलगी ऐश्वर्या अर्जुन नुकतीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता-दिग्दर्शक थंबी रामैय्या यांचा मुलगा उमापती रामैय्याशी तिने लग्न केलं. ऐश्वर्या आणि उमापती हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

1 / 5
10 जून रोजी चेन्नईत हा लग्नसोहळा पार पडला. ऐश्वर्या आणि उमापती यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने लाल आणि सोनेरी रंगाची पारंपरिक पट्टू साडी नेसली होती. तर उमापतीने मोती रंगाचा धोती सेट परिधान केला होता.

2 / 5
चेन्नईमधील अंजनसुता श्री योगंजनेयस्वामी मंदिरात सकाळी 9 ते 10 या वेळेत हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजके पाहुणे आणि मित्रपरिवार उपस्थित होता. ऐश्वर्या आणि उमापतीच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

3 / 5
ऐश्वर्या आणि उमापती यांची पहिली भेट 2021 मध्ये 'सर्व्हाइव्हर तमिळ' या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. विशेष म्हणजे या शोचं सूत्रसंचालन ऐश्वर्याचे वडील अर्जुन यांनीच केलं होतं. दोन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी 28 ऑक्टोबर 2023 रोजी साखरपुडा केला.

4 / 5
7 जूनपासून ऐश्वर्या आणि उमापतीच्या मेहंदी आणि संगीतच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. चेन्नईमधल्या अर्जुनच्या घरातच हे कार्यक्रम पार पडले. संगीताच्या कार्यक्रमाला तमिळ चित्रपटसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. येत्या 14 जून रोजी 'लीला पॅलेस'मध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं जाणार आहे.

5 / 5
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.