“..अन् मी मोठा स्टार होईन असं वाटलं पण..”, बिग बींच्या नातूचा भ्रमाचा फुगा फुटला

‘द आर्चीज’ या चित्रपटातून अगस्त्यसोबतच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांनीसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यातील स्टार किड्सच्या अभिनयाची खिल्लीदेखील उडवली आहे.

| Updated on: Jan 13, 2024 | 12:16 PM
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल अगस्त्य नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

1 / 6
“प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, नकारात्मक प्रतिक्रियांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मला अजूनही समजत नाही. जेव्हा तुम्ही या क्षेत्रासाठी पूर्णपणे  तयार नसता, तेव्हा इतक्या लोकांची इतकी मतं असू शकतात हे तुम्हाला माहीत नसतं. काहींना आवडला, काहींनी टीका केली”, असं अगस्त्य म्हणाला.

2 / 6
अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. पहिल्या प्रयत्नाविषयी तो पुढे म्हणाला, “काही ठिकाणी मला नीट काम जमलं नाही. पण ठीक आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि यापुढे मी अधिक मेहनत घेईन.”

3 / 6
टीकेबद्दल फारसा विचार न करता सकारात्मक बाजूकडे पाहण्याचं 23 वर्षीय अगस्त्यने ठरवलं आहे. “शूटिंगदरम्यान माझे सहा चांगले मित्र झाले. मला खूप चांगली संधी मिळाली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मी माझे प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही करत राहीन. नकारात्मक प्रतिक्रियांचा मी माझ्यावर फार परिणाम होऊ देणार नाही“, असं तो पुढे म्हणाला.

4 / 6
आजोबा अमिताभ बच्चन, मामा अभिषेक बच्चन, मामी ऐश्वर्या राय बच्चन यांचं यश पाहून अभिनेता होणं खूप सोपं असतं, असा विचार केल्याची कबुली अगस्त्यने यावेळी दिली. “मला असं वाटलं की प्रत्येकजण मला मिठी मारेल, माझ्यावर प्रेम करेल. पण लोक इतक्या नकारात्मक पद्धतीनेही बोलतील, अशी मला अपेक्षा नव्हती”, असं अगस्त्यने सांगितलं.

5 / 6
“हे सर्वकाही खूप सोपं असेल असं मला वाटलं होतं. तुम्ही एखादा चित्रपट करता, लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही स्टार होता.. असा माझा भ्रम होता. मात्र पहिले रिव्ह्यू समोर आल्यानंतर हा फुगा फुटला. हे सर्व इतकं सोपं नसतं हे मला समजलंय”, अशी कबुली अगस्त्यने दिली.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.