चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूरकरांचा आक्रोश; रस्त्यावर उतरले संतप्त नागरिक

बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी नागरिक संतप्त झाले आहेत. शाळेच्या गेटवर असंख्य पालकांनी ठिय्या आंदोलन केलं असून रेल रोकोही करण्यात आला आहे. यामुळे कर्जत-कल्याणदरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.

| Updated on: Aug 20, 2024 | 1:02 PM
बदलापूर पूर्व इथल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून टीकेची झोड उठली आहे. याविरोधात आज (मंगळवार) सकाळपासून शाळेच्या गेटवर पालकांचं आंदोलन सुरू आहे. तर बदलापूर स्थानकावरही रेल रोको करण्यात आला आहे.

1 / 6
शाळेने मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबित केलं आहे. नागरिकांनी मंगळवारी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला असताना आदल्या दिवशी शाळेने माफीनामा सादर केला. आरोपी कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली असून त्याची भरती करणाऱ्या कंत्राटदार कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्यात आल्याचंही शाळेनं स्पष्ट केलंय.

2 / 6
हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आलं आहे.

3 / 6
पालकांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याचा आरोप बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर होत होता. त्यानंतर शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

4 / 6
आज सकाळपासूनच संतप्त पालकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलंय. याठिकाणी मोठ्या संख्येनं पालक जमले होते. 'साहेब.. आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे', असा मजकूर लिहिलेल्या फलकाने सर्वांचं लक्ष वेधलं.

5 / 6
बदलापूर रेल्वे स्थानकावरही रेल रोको आंदोलन करण्यात आल्याने कल्याण-कर्जतदरम्यानची रेल्वे सेवा तासाभरापासून ठप्प झाली आहे. अनेक आंदोलक रेल्वे रुळावर उतरले आहेत.

6 / 6
Follow us
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.