AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’ विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरोधात FIR दाखल; नेमकं प्रकरण काय?

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा ‘बिग बॉस 17’चा विजेता ठरला. बिग बॉसची ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेडा कार मुनव्वरने आपल्या नावे केली. या विजयानंतर मुनव्वर जेव्हा डोंगरीला परतला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारो चाहते रस्त्यावर आले होते.

| Updated on: Jan 31, 2024 | 1:49 PM
Share
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर मुनव्वरने मुंबईतील डोंगरी भागात रोड शो केला होता. यावेळी बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर करण्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही परवानगीशिवाय रोड शोमध्ये ड्रोनचा वापर केल्याने मुनव्वरच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

1 / 5
मुनव्वरच्या या चाहत्याचं नाव अरबाज युसूफ खान असं आहे. मुंबई पोलीसचे कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी पीएसआय तॉसिफ मुल्ला यांच्यासोबत मिळून ड्रोनला मॉनिटर केलं होतं. त्यानंतर पोलिसांना ड्रोन ऑपरेटरविषयी माहिती मिळाली. पोलीस चौकशीदरम्यान अरबाज युसूफ खान हे नाव समोर आलं आहे.

2 / 5
मुंबई पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय ड्रोन कॅमेरा वापरण्यात येत नाही. त्यासाठी आधी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. लोकांच्या सुरक्षेखातर बेकायदेशीररित्या ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त पोलिसांनाच ड्रोनच्या वापराची परवानगी आहे.

3 / 5
पोलिसांनी अरबाजकडे ड्रोनच्या वापराबद्दल विचारणा केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ड्रोन जप्त केला आहे. ड्रोनच्या वापराबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल, सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमांचं पालन न केल्याबद्दल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

4 / 5
बिग बॉस हा लोकप्रिय शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकी ट्रॉफी घेऊन डोंगरी भागात आला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

5 / 5
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.