नोरा फतेही झलक दिखला जा १० च्या शूटिंगसाठी मुंबईत दिसली. यावेळी तिने छान असा रेट्रो लूक केला होता. अबोली रंगाची साडी, वेस्टर्न ब्लाऊज असं हे कॉम्बिनेशन होतं. तिची हेअर स्टाईल सुद्धा तिच्या रेट्रो साडीला शोभेल अशी होती.
गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. बॉलीवूडमध्ये अनेक लोकं घरी गणपती बसवतात. शिल्पा शेट्टी, राहुल वैद्य, एजाज खान ही यातली आघाडीची नावं आहेत. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन पार पडलं त्यावेळी ही जोडी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये दिसून आली.
अनुपमा सिरीयल मधली सर्वांची लाडकी अनुपमा! रुपाली गांगुली लालबागच्या दर्शनासाठी आली होती. तिने सहपरिवार हजेरी लावली होती. अनुपमाने हिरवी साडी नेसली होती. हिरव्या साडीतील तिचा हा लूक अतिशय सुंदर होता.
नोरा फतेही सोबतच माधुरी दीक्षितला सुद्धा स्पॉट केलं गेलं. माधुरी दीक्षित लाल कलरच्या पोल्का डॉट्स साडीमध्ये दिसून आली. नेहमीप्रमाणेच माधुरी दीक्षितचा जलवा काही औरच होता!
एजाज खान आणि पवित्रा पुनिया ही नेहमीच चर्चेत असणारी जोडी सुद्धा घरच्या बाप्पाचं विसर्जन करताना दिसून आली. यावेळी पवित्रा पुनियाच्या हातात गणपती बाप्पा दिसून आले.