तुम्ही जर नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु एकरकमी पैसे देणे शक्य नसेल तर तुम्ही फायनान्सअंतर्गत बाईक खरेदी करु शकता. फायनान्सवर खरेदीसाठी 100cc इंजिनवाली Bajaj CT100 एक चांगला पर्याय आहे.
Bajaj CT100 चं KS Alloy व्हेरिएंट 6,000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करता येईल. या मोटरसायकलची एकूण किंमत 55,214 रुपये (ऑन रोड प्राइस, दिल्ली) इतकी आहे.
डाऊन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा 1,218 रुपये EMI द्यावा लागेल. आपण 5 वर्षांसाठी कर्जावर फायनान्स स्कीम घेऊ शकता. अशा परिस्थितीत आपण 23,866 रुपये व्याजासहित एकूण 73,080 रुपये द्याल.
याशिवाय तुम्ही 3 वर्षांसाठी 49,326 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. त्यावर 9.7 टक्के व्याज दर असेल. म्हणजेच 14,326 रुपयांच्या व्याजासह तुम्हाला 63,540 रुपये द्यावे लागतील. या दरम्यान तुम्हाला EMI वर 1,765 रुपये द्यावे लागतील.
Bajaj CT100 मध्ये 102cc इंजिन देण्यात आलं आहे, जे 7.9ps पॉवर आणि 8.34nm टॉर्क जनरेट करतं. या बाईकमध्ये ड्रम ब्रेक आणि ट्यूब टायर्स देण्यात आले आहेत. ही बाईक 90 किमी/ लीटर इतकं मायलेज देते.