अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्री हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
दिल्ली 6’ सिनेमात झळकण्यापूर्वी आदितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती.
मोठ्या पडद्यावर यश मिळालं नसलं तरी अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर अदितीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अदिति राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘रॉकस्टार (Rockstar)’, ‘दास देव (Daas Dev)’ आणि ‘पद्मावत (Padmaavat) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.