नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटात परश्याची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
सध्या सोशल मीडियावर आकाशच्या नव्या फोटोंचीच हवा आहे.
'संभ्या इज कमिंग, अब कुछ बडा लफडा होगा,' असं कॅप्शन देत आकाशने त्याच्या या नव्या लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.
आगामी 'झुंड' या चित्रपटातील आकाशचा हा खास लूक आहे.
आकाशच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. वैदेही परशुरामी, आदित्य सरपोतदार यांसारखे कलाकारसुद्धा आकाशच्या या नव्या लूकवर फिदा झाले आहेत.
क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित 'झुंड' या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारत आहे.
नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे.
या चित्रपटात 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तिचा चित्रपटातील लूक अद्याप समोर आला नाही.
'सैराट'नंतर आकाशने त्याच्या लूकवर, शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतली आहे.
सोशल मीडियावर तो हटके लूक्स पोस्ट करत असतो. त्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत असतो.