पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद निर्माण झालाय. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने टीका केली जात आहे. मात्र, यापूर्वीही अनेक चित्रपटांच्या गाण्यामध्ये भगवे कपडे घालण्यात आले आहेत.
सुष्मिता सेन हिने मैने प्यार क्यूं किया या चित्रपटातील लगा रे प्रेम रोग या गाण्यामध्ये भगव्या रंगाची साडीच घातली आहे. हे गाणे ही खूप हीट ठरले होते.
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे धक धक करने लगा हे गाणे हीट झाले. इतकेच नाहीतर या गाण्यावरूनच माधुरीचे नाव धक धक गर्ल पडले आहे. या गाण्यामध्ये माधुरी हिने भगव्या रंगाचेच कपडे घातले होते.
रवीना टंडन हिचे प्रसिध्द गाणे टिप टिप बरसा पानी हे देखील हीट झाले. या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या गाण्यात रवीना हिने भगव्या रंगाचा ड्रेस घातला होता.
सूर्यवंशी या चित्रपटामध्ये कतरिना कैफ हिने देखील भगव्या रंगाची साडी घालून अत्यंत बोल्ड लूक करत अक्षय कुमारसोबत डान्स केला होता.
दिलवाले या चित्रपटामध्ये काजोल भगवे कपडे घालूनच शाहरुख खान याच्यासोबत रोमांन्स करत होती. दिलवाले चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते.