बिग बाॅस १६ हीट झाले असून घरातील स्पर्धेक जोरदार हंगामा करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर बिग बाॅसमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धेकांचे भाष्य देखील साथ देत आहेत.
निम्रत काैर हिच्यानंतर आता टीना दत्ता हिला एका मोठ्या चित्रपटाची आॅफर आल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाहीतर हा एक साऊथचा चित्रपट आहे.
या चित्रपटामध्ये टीना दत्ता ही एका मोठ्या नेत्याच्या मुलीच्या भूमिकेमध्ये असणार आहे, अशी चर्चा आहे. टीना दत्ता हिने मालिकांसोबतच अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तेलगू चित्रपटात टीना आता काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे हे देखील सांगितले जात आहे की, हा चित्रपट बिग बजेटचा आहे.
बिग बाॅसच्या घरात टीना दत्ता आणि शालिन भनोट यांची लव्ह स्टोरी काही दिवस चाहत्यांना बघायला मिळाली होती. मात्र, आता शालिन आणि टीना पक्के वैरी झाल्याचे दिसत आहे.