अभिनेता इमरान हाशमी याचा जन्म मुंबईचा. इमरानचं मूळ नाव सय्यद इमरान अनवर हाशमी.
इमरानचे वडील मुस्लिम होते तर आई इसाई पण नंतर त्यांनी धर्मपरिवर्तन करून मुस्लिम धर्म स्विकारला.
इमरानने 'फुटपाथ' या सिनेमामधून सिनेमृष्टीत कामाला सुरूवात केली. त्यानंतर आलेला 'मर्डर' हा सिनेमा खूप चालला.
पुढे त्याने आशिक बनाया आपने, चॉकलेट- डीप डार्क सिक्रेट, जवानी दिवानी, अक्सर, गँन्गस्टर, द किलन, आवारापन, शांघाई या सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. जन्नत, जन्नत 2, हे त्याचे सिनेमे गाजले.
अलिकडेच त्याचा अजहर हा सिनेमाही आला होता. ज्याची खूप चर्चा झाली. हमारी अधुरी कहानी हा सिनेमाही त्याच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. इमरान बोल्ड सिनचा राजा म्हणून हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे.