सारा अली खान सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.
साराने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं. यात ती ब्लॅक कलरच्या ट्रान्सफरंट ड्रेसमध्ये दिसतेय. तिच्या या फोटोला 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
साडे पाच हजारांहून अधिक कमेंट्स या फोटोवर पहायला मिळत आहेत. यात बऱ्याच कमेंटमध्ये जाळाची इमोजी वापरलेली दिसतेय.
सारा अली खानचं हे बिकिनी फोटो शूटही चांगलंच चर्चेत होतं. तिच्या या फोटोला 17 लाखांहून अधिकांनी पसंती दिली होती.
सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. सिंबा, कुली नंबर 1 अतरंगी रे या चित्रपटात तिने काम केलं आहे.