Amrita Singh Birthday : अमृता सिंहचं करिअर, 12 वर्षांनी लहान सैफ अली खानवर प्रेम-लग्न-घटस्फोट, सगळं वाचा एका क्लिकवर…

अभिनेत्री अमृता सिंह यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची जीवनकहानी जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 09, 2022 | 8:10 AM
अभिनेत्री अमृता सिंह यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 ला पाकिस्तानमध्ये झाला. अमृता यांची आई रुख्शाना सुलतान या राजकारणात होत्या. अमृता या लेखक खुशवंत सिंग यांच्या भाची आहेत.

1 / 7
अमृता यांनी 1985 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर अमृताला इतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 80 च्या दशकात टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जायच्या. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

2 / 7
सुरूवातीच्या काळात अमृता यांचं नाव क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासोबत जोडलं गेलं. या दोघांनी एका मॅगझिनच्या कव्हरसाठी एकत्र फोटोशूट केलं. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी वाढली. रवी शास्त्रींसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता आणि अभिनेते विनोद खन्ना या दोघांच्या अफेअरची चर्चा झाली. विनोद खन्ना हे अमृता यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते आणि त्यांच्यावर अमृता यांना क्रश होता.

3 / 7
अमृता सिंग आणि सैफ अली खान या दोघांची लव्हस्टोरी, त्यांचं लग्न आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट या सगळ्याच गोष्टी खूप चर्चा झाली. या दोघांची पहिली भेट राहुल रवैल यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटले.  या चित्रपटातून सैफ अली खान डेब्यू करणार होता. राहुल अमृताचा चांगला मित्र होता. त्याने या दोघांना एकत्र एक फोटोशूट करायला सांगितलं. फोटोशूटदरम्यान सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने अमृताकडे पाहिलं आणि तो त्यांच्या प्रेमात पडला. या फोटोशूटनंतर तो अमृता यांना भेटण्यासाठी थांबला.

4 / 7
हळूहळू दोघांची मैत्री वाढू लागली. एकेदिवशी सैफने ठरवलं की अमृताला डेटवर जाण्यासाठी विचारायचं त्यासाठी त्याने फोन केला आणि विचारलं, 'तुला माझ्यासोबत डिनर डेटवर जायला आवडेल का?' हे ऐकून अमृता म्हणाल्या, 'नाही... मी बाहेर जेवायला जात नाही, तुला इच्छा असल्यास माझ्या घरी जेवायला येऊ शकतो. हे ऐकून सैफ भडकला पण तो अमृता यांच्या घरी जेवणासाठी गेला. तिथून पुढे त्यांची मैत्री फुलत गेली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मग लग्नाचा निर्णय घेतला. सैफ अमृता यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

5 / 7
यानंतर दोघांनी 1991 मध्ये या दोघांनी इस्लाम धर्माच्या रितींनुसार लग्न केलं. घराकडे जास्त लक्ष देता यावं म्हणून त्यांनी आपल्या करिअरमधून काही काळ ब्रेक घेतला. याकाळात या दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं झाली. पण त्यांच्या या चाललेल्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला आणि 13 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.

6 / 7
अमृता आणि सैफच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली तेवढीच या दोघांच्या विभक्त होण्याचीही चर्चा झाली. मधल्या काळात त्यांनी काही काळासाठी ब्रेक घेतला. मुलांकडे लक्ष दिलं. त्यानंतर त्यांनी 2005 मध्ये एकता कपूरची टीव्ही सीरियल 'काव्यांजली'मध्ये काम केलं. तसंच त्यांनी हिंदी मीडियम, फ्लाइंग जट आणि टू स्टेट्स यांसिनेमांमध्येही काम केलं आहे. अमृता आणि सैफ यांची मुलगी सारा अली खानही बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिच्या सिनेमांनाही चांगला प्रतिसाद मिळतो.

7 / 7
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.