दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत असलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का? ही चिमुकली आता बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्रीदेवी यांच्यासोबत असलेली ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची मुलगी जान्हवी कपूर आहे.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करत आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'तुझ्याशिवाय आमच्या आयुष्यात आणखी एक वर्ष जोडलं गेल्याचा मला राग आहे. पण मला आशा आहे की तुला आमचा अभिमान वाटेल. कारण हीच एक गोष्ट आहे, जी आम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत आहे. तुझ्यावर कायम प्रेम आहे', अशा शब्दांत जान्हवीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र मुलीचा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं.
जान्हवी लवकरच 'दोस्ताना २', 'गुडलक जेरी' आणि 'मिली' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.