शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे ‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.डिसेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.