Happy Birthday Yami Gautam | बनायचं होतं IAS अधिकारी, शिक्षण घेतलं वकिलीचं अन् करिअर म्हणून अभिनय क्षेत्राकडे वळली यामी गौतम!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिचा आज (28 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. यानंतर यामी गौतमने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करून खूप नाव कमावले.
मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिचा आज (28 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. यानंतर यामी गौतमने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करून खूप नाव कमावले. जे कलाकार यामी गौतमसोबत काम करतात, ते अनेकदा सांगतात की, तिला प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे आणि थेट ऐकायला आवडते. आज आम्ही देखील तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत…
अभिनेत्री यामी गौतम हिचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण हिमाचल प्रदेशातून झाले. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी यामी गौतम चंदिगडमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होती. त्यावेळी तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते, परंतु तिने नंतर अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत येऊन आपल्या करिअरला सुरुवात केली.
मालिकेतून करिअरची सुरुवात
यामी गौतम पहिल्यांदा ‘चांद के पार चलो’ या टीव्ही मालिकेत दिसली होती. ही मालिका 2008 मध्ये छोट्या पडद्यावर आली होती. यानंतर तिने दीर्घकाळ छोट्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. यामी गौतमने ‘उल्लास उठास’ या कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 2009 मध्ये तिचा हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर यामी गौतमने पंजाबी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले.
?
Saree : @ekayabanaras Earrings : #MotifsbySurabhiDidwania attached with my dejhoor Necklace and bangles : #FineFineryStore Cuff : #KhariKajai Hair pin : #Azgao Styled by : #ManishaMelwani pic.twitter.com/XrB9DAhmo4
— Yami Gautam Dhar (@yamigautam) September 7, 2021
बॉलिवूडमध्ये पदार्पण
यामी गौतमने 2012 मध्ये अभिनेता आयुष्मान खुरानासोबत ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मोठ्या पडद्यावर आयुष्मान आणि यामीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर यामी गौतमने ‘बदलापूर’, ‘काबिल’, ‘उरी’ आणि ‘बाला’ यासह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले.
सामाजिक कार्यातही सक्रिय अभिनेत्री
यामी गौतमला सामाजिक कार्यात खूप रस आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ती दीर्घकाळापासून काम करत आहेत. यामी गौतमने हिमाचल प्रदेशातही जमीन विकत घेऊन तिथे ग्रीन हाऊस बनवले असून, तेथे ती सेंद्रिय शेती करते. याशिवाय ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि योगाला प्रोत्साहन देते. ती अनेकदा योगा करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
हेही वाचा :
नव्या ‘शेवंता’चा बोल्ड अंदाज पाहून जुनीलाही विसराल, सोशल मीडियावर होतेय फोटोंची चर्चा!
आधी ओळखण्यासही नकार, आता महाठकासोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल! जॅकलिनच्या अडचणी वाढणार!