राणी चटर्जी भोजपुरी सिनेमाची एक उत्तम कलाकार आहे. राणीनं भोजपुरीमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे, म्हणूनच राणी चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
राणी चटर्जी आपल्या ग्लॅमरस लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच राणीनं चाहत्यांसाठी साधे आणि स्टाईलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राणी फ्लोरल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली राणी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यादरम्यान तिनं लाइट मेक-अप केला आहे. सर्व फोटोंमध्ये राणी वेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
राणी अशी एक अशी अभिनेत्री आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी कनेक्ट होत असते. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर राणीचे 1.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर ती स्वत: फक्त 45 लोकांना फॉलो करते.