मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिची अदाकारी आणि दिमाखदार सौंदर्याची भूरळ सबंध महाराष्ट्राला पडते. सध्यातर सोनालीने इन्स्टाग्रामवर साडीमधील काही खास फोटो अपलोड केले आहेत.
सोनाली कुलकर्णीने साडी परिधान करत मोकळ्या केसांमध्ये फोटोशूट केलं आहे. हलकासा मेकअप केल्यामुळे सोनालीचे सौंदर्य चांगलेच खुलल्याचे दिसतेय.
फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर तू खूपच छान दिसत असल्याचं सोनाली कुलकर्णीला सांगितलं आहे.
सोनालीने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान मिळवलेलं आहे. तिने अभिनय केलेला पांडू हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
तिच्या या चित्रपटाला महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतले असून या चित्रपटाने भरगोस कमाई केली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे