माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाने नुकतंच यशसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर आता नेहाचा लुक बदलणार आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने याबाबतची माहिती दिली आहे. तिच्या इन्स्टाग्रामला काही फोटो शेअर करत तिने नेहाचा हा नवा लूक शेअर केला आहे.
"नेहाचं रुप बदलतंय. लवकरच तुम्हाला तिला या लूकमध्ये पाहता येईल", असं कॅप्शन प्रार्थनाने दिलं आहे.
याआधी नेहा पंजाबी ड्रेस त्यावर टिकली अश्या लूकमध्ये बघायला मिळायची. आता मात्र तिच्या ड्रेसमध्ये बदल झालाय.
प्रार्थना बेहरे मागच्या काही दिवसांपासून तिचे हटके अंदाजातले फोटो शेअर करत आहे."न्यू मी", असं कॅप्शन देत ती आपले हटके फोटो शेअर करत आहे.