अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या इन्स्टाग्रामवर मागच्या काही दिवसांपासून काही हटके फोटो शेअर करत आहे. आजही तिने असेच फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना बेहरेने शर्ट आणि चॉकलेटी रंगाच्या ब्रामधले फोटो शेअर केले आहेत.याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
या फोटोला तिने "न्यू मी" असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोला 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अनेकांनी कमेंट करून प्रार्थनाच्या या फोटोवर आपलं मत दिलं आहे."तू अशक्य सुंदर दिसते आहेस", असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने तिची तुलना थेट राणी मुखर्जीशी केली आहे.
याआधीही प्रार्थनाने आपला 'न्यू लुक' शेअर केला होता. तिच्या गुलाबी रंगाच्या या ड्रेसमधल्या फोटोचंही चांगलंच कौतुक झालं होतं.