अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचा आज वाढदिवस आहे. रूपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मधुराणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दोघींचे फोटो शेअर करत तिने मधुराणीला 'हॅपी बर्थडे' म्हटलंय. "तुझा आजचा दिवस खास असेलच आणि येतं वर्ष तुझ्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो... तुला खूप सारं प्रेम", असं कॅप्शन रूपालीने या फोटोला दिलं आहे.
मधुराणी गोखले आणि रूपाली भोसले या दोघी 'आई कुठे काय करते' या मालिकेत एकत्र काम करत आहेत. मधुराणी अरूंधतीचं तर रूपाली संजना हे पात्र साकारत आहे.
याआधीही रूपालीने या मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर केले होते.
रूपाली याआधी बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती. तर मधुराणी या ट्रेनिंग इस्ट्युट्युटच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे देत होत्या.