वैदेही परशुरामी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो शेअर करत आपल्या कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांना उर्जा देते. आताही तिने असेच हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक हटके संदेश दिला आहे.
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुमच्या जीवनात रंग भरणारा रंगीत ब्रश कुणाच्याही हाता देऊ नका", असं कॅप्शन वैदैहीने आपल्या फोटोंना दिलं आहे.
वैदेहीने याआधीही असाच एक संदेश दिला होता. "तुम्हाला कंफर्टेबल असणारे कपडे घाला आणि एक स्टाँग कॉफी प्या आणि बघा तुम्हाला उत्साह जाणवेल आणि तुमचा सोमवारचा दिवस छोटा झाल्यासारखं वाटेल", असं कॅप्शन देत वैदेहीने सोमवारी उत्साहात काम करण्यासाठी हटके फंडा दिला होता.
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा 'झोंबिवली' आणि 'लोच्या झाला रे' हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकांचं सर्वत्र कौतुक होतंय.
'वेड लागी जीवा' या चित्रपटातून वैदेहीने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतर 'कोकणस्थ', 'वृंदावन', 'सिंबा' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमातील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं. वैदेहीला अभिनयासोबतच नृत्याचीदेखील आवड आहे.