AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला..’, सत्तेच्या ‘खुर्ची’त विराजमान होणार चिमुकला अभिनेता!

'आला आला आला आला खुर्चीचा राजा आला' अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले असून सत्तेसाठीच्या डावपेचांना मोठया पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांनाही उत्कंठा लागून राहिली आहे.

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 12:26 PM
Share
'आला आला आला आला खुर्चीचा राजा आला' अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले असून सत्तेसाठीच्या डावपेचांना मोठया पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. या मोशन पोस्टरच्या शेवटी एक लक्षवेधी चेहरा सत्तेच्या खुर्चीत राजासारखा बसलेला असून त्याच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे, हा चेहरा म्हणजे अभिनेता आर्यन संतोष हगवणे आहे. आर्यन या चित्रपटात राजवीर राजाराम देसाई या नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

1 / 5
आर्यन खुर्ची या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'ऍक्ट प्लॅनेट ऍकटिंग' अकॅडमी आणि जवळच्या भरपूर व्यक्तींकडून आर्यनने अभिनयाचे धडे घेत त्याने अभिनयाची आवड जोपासली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून फॅशन मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करून त्यानंतर आर्यनने अभिनयक्षेत्रात बरीच पारितोषिक पटकवली. चित्रपटाबद्दल बोलताना आर्यन असे म्हणाला की, ‘खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपट असून मी पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले’.

2 / 5
विशेष म्हणजे आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाच्या टिझर नंतर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टर मध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासंदांचे प्रेम, प्रचार याचे हुबेबुब वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.

3 / 5
‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर आणि अमित बैरागी  यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.  या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांची असून दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील अँड ऍक्ट प्लॅनेट यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रितम एस के पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली.

4 / 5
खुर्चीसाठी खेळली जाणारी लढाई खेळताना त्याचा इतरांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आर्यनला या खुर्ची चित्रपटात सत्तेसाठीच्या खुर्चीवर बसलेले पाहून चित्रपटात नेमके काय घडले असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

5 / 5
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.