बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) पुन्हा एकदा गर्भवती आहे. अंगद आणि नेहा लवकरच आपल्या दुसर्या बाळाचे स्वागत करणार आहेत.
सुपर मॉडेल, अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट नेहा धुपिया वयाच्या 41 व्या वर्षी पुन्हा आई होणार आहेत. प्रेग्नेंट नेहा सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. काही वेळापूर्वी तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
अभिनेत्री नेहा धुपियाने नुकतेच एका मॅगझीनसाठी खास मॅटरनिटी फोटोशूट केलं आहे. यावेळी गर्भवती नेहा धुपियाचा ‘सुपर मॉडेल’ अवतार दिसला.
नेहा धुपियाचे फोटो पाहून चाहते आणि सेलेब्स कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हृदय आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. अनेकजण तिला हॉट मॉम, भव्य, फॅब असंही म्हणत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने 3 वर्षांपूर्वी अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसोबत 10 मे 2018 रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये अतिशय खासगी सोहळ्यात लग्न केले होते. 18 नोव्हेंबर 2018 रोजी 6 महिन्यांनंतर त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता.
रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री नेहा धूपिया लवकरच एका वेब शोमध्ये कॉपच्या भूमिकेत दिसणार असून, या सीरीजमध्ये अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. याशिवाय ती विद्युत जामवाल आणि रुक्मिणी मैत्रांसोबत ‘सनक’ या अॅक्शन फिल्ममध्येही दिसणार आहे.