Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files मध्ये वाशिमच्या मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली भूमिका; दोन महिने कडाक्याच्या थंडीत केलं शूटिंग

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाची सुरुवात शिवा पंडित ही भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराच्या दृश्याने होते. पृथ्वीराज सरनाईक याने ही भूमिका साकारली आहे.

| Updated on: Mar 22, 2022 | 11:38 AM

1 / 7
पृथ्वीराज हा दहा वर्षांचा असून तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखला इथला आहे. पृथ्वीराजने शिवा पंडितच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला असून काश्मिरमध्ये दोन महिने कडाक्याच्या थंडीत त्याने शूटिंग केलं. द काश्मीर फाईल्समध्ये पृथ्वीराजने पडद्यावरील अनुपम खेर यांच्या नातूची भूमिका साकारली आहे.

2 / 7
द काश्मीर फाईल्समध्ये काम करण्यापूर्वी पृथ्वीराजने विविध जाहिरातींमध्ये काम केलं आहे. मात्र चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाला देशभरात भरभरून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 160 कोटींहून अधिक कमाई झाली आहे.

3 / 7
पृथ्वीराज हा प्रसिद्ध व्यावसायिक उल्हासराव देशमुख यांचा नातू आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पृथ्वीराजची आई प्राची यासुद्धा त्याच्यासोबत काश्मिरमध्ये राहत होत्या. काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षेत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं.

4 / 7
शूटिंगदरम्यान त्याची चित्रपटातील इतर कलाकारांसोबत चांगली गट्टी जमली होती. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांनीसुद्धा त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

5 / 7
1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

6 / 7
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला होता. खुद्द पल्लवी यांनी याविषयीची माहिती दिली होती.

7 / 7
Follow us
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.