जास्मिन सँडलस हिचा जन्म पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. 13 वर्षांची झाल्यानंतर तिचं संगोपन कॅलिफोर्नियामध्ये झालं. पण तिला गायनाची आवड होती. तिच्या आईने तिला गायनासाठी प्रोत्साहित केलं. शाळेत असताना तिने एक स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिला वाटू लागलं की आपण चांगली गायिका होऊ शकतो त्यासाठी तिने विशेष तयारी सुरू केली. 16 व्या वर्षी तिने गायनाला सुरूवात केली.