अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे आलिबागकडे रवाना झाले आहेत. आलिबागला जाताना दोघे स्पाॅट झाले आहेत.
आॅगस्टमध्येच दीपिका आणि रणवीर यांनी आलिबागमध्ये 22 कोटींचा बंगला खरेदी केला होता. याचे काही फोटोही त्यांनी शेअर केले होते.
ख्रिसमस आणि न्यू इयर दीपिका आणि रणवीर आलिबागमध्येच सेलिब्रेट करणार आहेत. आता दीपिका आणि रणवीरचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
नुकताच रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची ओपनिंग ठिक झालीये नाहीये. रोहित शेट्टीचा हा बिग बजेटचा चित्रपट आहे.
काही दिवसांपूर्वी अफवा होती की, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असून हे घटस्फोट घेणार आहे. परंतू या अफवा असल्याचे स्पष्ट झाले.